*सावनेर पोलीसांच्या कायदेशीर कारवाई व सक्तीमुळेच रस्त्यावरील गर्दी आटोक्यात येईल*
*पथ संचालन करुण प्रशासनीक शक्तीचे प्रदर्शन करणार्यां पोलीस कर्मचार्यांवर नागरिकांनी केला फुलांचा वर्षाव*
*विन वाहन परवाना रस्त्यावर उतरणार्या वाहन चालकांवर कारवाई चा सपाटा*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सह प्रतिनिधी सुरज सेलकर/दिनेश चौरसीया*
*सावनेरः सदरक्षणाय् खलनिग्रहनाय या बिद वाक्याला उराशी बाळगून आपल्या व आपल्या परिवाराची काळजी झागूरुन देशावर आलेल्या या कोरोना वायरस च्या संकटात आपले कर्तव्य बजावणार्या पोलीस व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना नागरिकांवर सक्ती न करता रस्त्यावरील गर्दी कमी करण्याचे आव्हानाला तोंड द्यावे लागत असुन याऊलट पोलीस काही करत नाही याचाही दंभ नागरिकांनकडून सोसावा लागत आश्यात अशी कोणती उपाययोजना आखावी की सक्ती ही करावी लागणार नाही व रस्त्यावर उतरणारी गर्दी ही कमी होईल*
*पोलीसांच्या पथसंचलनावर नागरिकांनी फुलांचा वर्षाव करुण केले उत्साहवर्धन*
*नागरिकांना या कोरोना वायरस मुळे उदभवलेल्या संकटकालीन परिस्थितीत आम्ही आपल्या सोबत आहोत फक्त आपण आपल्या घरीच रहून सहकार्य करा व याप्रसंगी शासनाने दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करा अश्या विनंती सोबतच स्थानिक पोलीस प्रशासनाने आपल्या अधिकारी कर्मचार्यांच्या सोबत नगरिच्या मुख्य मार्गांने पथ संचालन करुण आपल्या शक्तीचे प्रदर्शन करत असतांना ठिकठिकाणी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करुण त्यांचे उत्साहवर्धन केले हे विशेष…*
*कायदेशीर कारवाई केल्याने नागरिकांना थोडा त्रास होईल परंतू रस्त्यावरील गर्दी नक्कीच कमी होईल*
-(एपीआय सतीश पाटील)
*नागरिकांना प्रेमाने अनेकवेळा विनंती व निवेदन करुण सुध्दा भाजीपाला,कीराणा,दुध,दही,सोबतच जुन्या दवाखान्याच्या चिठ्ठ्या,औषधीचे खाली रेपर,बँक व्यवहार सोबतच या ना त्या कारणाने विनाकारण रस्त्यावर गर्दी करणार्यांची गर्दी थांबवीन्याकरिता गांधी चौक येथे दररोज नाकेबंदी करुण तेथून आवश्यक कामाकरिता निघणार्या नागरिकांना वगळता रस्त्यावर नाहक गर्दी करणारा युवक वर्ग तसेच इतरांशी थोडी सक्ती करण्यात येत आहे त्यामुळेच मागील दोन दिवसापासून रस्त्यावर गर्दी कमी झाल्याचे दिसून येत आहे.सदर ची कारवाई अशीच दररोज सुरु राहणार असल्याने नागरिकांना परत विनंती करण्यात येते की अतीआवश्यक कामा शिवाय घराच्या बाहे पडू नका व घराच्या बाहेर पडतांना आपल्या सोबत आपले ओळखपत्रे वाहन परवाना इत्यादी सोबत ठेऊन पोलीसांना सहकार्य करा असे निवेदन एपीआय सतीश पाटील यांनी केले आहे*
*सदर कारवाईत पीएसआय निशांत जुनूनकर,एपीआय सतीश पाटील,वाहतूक नियंत्रक अधिकारी अशोक आठवले,दिनेश काकडे,निलेश तायडे,गणेश उइके,धोंडीबा नागरमोते,बळीराम बेहूने,विजय पांडे,प्रकाश नांदुरकर,सुधिर यादगीरे,आशीष कारेमोरे,हे.सुनील व्यवहारे,राजेंद्र यादव,गौतम मेश्राम,प्रकाश ढोके,दिनेश गाडगे,होमगार्ड कर्मचारी आदींनी भाग घेतला*