जागेच्या वादातून शेजाऱ्याचा खुन
पोलिसांनी आरोपिला अटक करून लाकडी दांडा जप्त केला
मौदा प्रतिनिधी -तुषार कुंजेकर
मौदा तालुक्यातील रेवराल येथिल घटना जागेच्या वादातून दोन महिलांचे भांडण सुरु असता एका महिलेच्या पतीने भांडनात हस्तशेप केला व दुसऱ्या महिलेच्या पतिवर लाकडी दांड्याने डोक्यावर छातीवर वार केला त्यात त्याचा उपचाराला नेत असता वाटेतच म्रुत्यू झाला पोलिसांनी आरोपीला अटक केली ही घटना अरोली पो.स्टेशन हदितिल रेवराल येथे सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.दिगांबर जागोबा घुले (५५) म्रुतकाचे तर मुरलीधर कानू ढोमने (३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे दोघेही रेवराल येथिल रहिवाशी असुन एकमेकांचे शेजारी आहेत दिगांबर यांच्या पत्नीने सकाळी ६ वाजताच्या सुमारास घरकामाला सुरवात केली असता त्यानंतर काही वेळाने मुरलीधरच्या पत्नीने दिगांबरच्या पत्नीसोबत भांडन्यास सुरवात केली
भांडण्याच्या आवाजामुळे मुरलीधर झोपेतून जागाच होऊन हातामध्ये लाकडी दांडा घेऊन घराबाहेर आला त्यावेळी दिगांबर त्याच्या घराच्या अंगनात उभा होता त्यांनी भांडणाकडे लक्ष दिले नव्हते दरम्यान काही वेळाच आत मुरलीधर दिगांबरच्या दिशेने गेला व त्याने दिगांबरच्या डोक्यावर छातीवर लाकडी दांड्याने वार केले त्यात दिगांबर गंभीर जखमी झाले व खाली पडले.
प्रकरनाची माहीती मिळताच गावातील सरपंच चिंतामण मदनकर यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना कळविले पोलिस घटनास्थळी पोहचले त्यांनी जखमीला लगेच नजिकच्या रुग्णालयात हलविले मात्र गावाबाहेर निघताच त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्याचा म्रुतदेह रामटेक येथिल उपजिल्हा रुग्णालयात उत्तरिय तपासणीसाठी पाठवीन्यात आला पोलिसांनी आरोपिला अटक करून लाकडी दांडा जप्त केला उपविभागिय पोलिस अधिकारी नयन आलुरकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती जाणुन घेतली याप्रकरणी अरोली पोलिसांनी भादवी ३०२ अन्वये गुन्हा नोंदवीला असुन पुढील तपास ठाणेदार विवेक सोनवाने करीत आहेत