*दुचाकी वाहनानी गवठी दारू परीवहन करणार्यांच्या आवरल्या मुसक्या*
*दोन दुचाकी वाहन,140 ली.मोहफुल दारू सह 91 हजार 920 रुपयाचा मुद्देमाल जप्त*
*राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई*
*मुख्य संपादक- किशोर ढुंढेले सावनेर*
*नागपूर : राज्य उत्पादन शुल्क क विभागाने पारडी पोलीस स्टेशन हद्दीत नागपूर भंडारा हायवे रोडवर जुना नाक्याजवळ चांप्या कडून अवैधरित्या मोहा दारूची वाहतूक करताना तसेच भांडेवाडी रेल्वे स्टेशन जवळ मद्य विक्री करताना असे एकूण तीन व्यक्तीना पकडून 140 लिटर हातभट्टी मोहा दारु व दोन वाहन असा एकूण रुपये 91 हजार 920 इतक्या किंमती चा मुद्देमाल जप्त केला*
*सदर घटनेत वापरण्यात आलेल्या दुचाकी मोपेड क्रमांक एम एच 49 बी. डी 6219 बजाज ॲक्टिवा प्लेटिना मोटर सायकल एम एच 49 ए बी 3190 वाहने जप्त करण्यात आल्या आहे. यामध्ये पंकज रामऔतर गौर व बबलू महादेवराव महाडिक तसेच मनीषा गुरुदेव बोरकर यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 नुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.* *सदरची कारवाई अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या दुय्यम निरीक्षक दिलीप बडवाईक सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रशांत येरपुडे, जवान निलेश पांडे महिला जवान सोनाली खांडेकर तसेच वाहन चालक रवी निकाळजे यांनी सहभाग घेतला.* *पुढील तपास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क रावसाहेब कोरे करत आहेत.*