मोवाड व गोधनी रस्तेवर राज्यस्थान वरुन आलेल्या २४ मजुराची कोरोना तपासणी
मोवाड प्रतिनिधी -श्रीकांत मालधुरे
महाराष्ट्रतील एकूण २४ मजूर हे राज्यस्थान वरून परत आप आपल्या गावात येत असतातना मोवाड गोधनी रस्तेवर दिसलेत हे २४ मजूर नरखेड,खरसोली,व जमगाव या ठिकाणची होती.याना मोवाड गोधनी रस्तेवर सोशल डिशिटन प्रमाणे तेथेच बसविण्यात आलेल्या व तेथेच मोवाड प्रथमिक आरोग्य केन्द्रचे वैद्यकीय अधिकारी संजय सोळकी यांना बोलावून २४ मजूराची कोरोना तपासणी करण्यात आली . यासर्वाची तपासणी हि निगेटिव्ह आढलीत . व सर्व मजूराना कोरोना आजार विषयी माहीती देण्यात आली. कोरोना जंतुनाशक फवारणी करून त्यानंतरच त्यांना आपल्याला गावी जणेस सांगितले यावेळी उपस्थित न.प.मुख्यधिकारी सिद्धार्थ मेश्राम .पोलीस चौकी मोवाड हवालदार शैलेश डोंगरदिवे व न.प.उच्च माध्यमिक मोवाड प्राचार्य ज्ञानेश्वर दोरोकर व इतर नगर परिषद कर्मचारी व तरुण स्वयंसेवक उपस्थित होते.