*ब्रेकींग न्यूज*
उपराजधानीत कोरोंना +VE ची संख्या 41 वर
रविवारी नवीन 14 रुग्ण वाढले
*विशेष प्रतिनिधी नागपूर*
*नागपुर–राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असतांना राज्याची उपराजधानी नागपुरात देखील धक्कादायक माहिती समोर आली.*
*रविवारी एक,दोन नाही तर तब्बल चौदा रुग्ण कोरोंना पॉझिटिव्ह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली.*
*नागपुरात हे सर्व रुग्ण रविवारी सकाळच्या सुमारास समोर आले. सकाळी दोन आणि दुपार पर्यंत 12 झाला असे एकूण 14 रुग्ण आढळल्याने नागपुरात खळबळ उडाली. यातील काही लोक दिल्लीतील निजामुद्दीन मरकज वरून आले असल्याचे विश्वसनिय सुत्र आहे.*
*एकूण वाढलेल्या आकडामुळे नागपूरची एकूण कोरोंना पॉझिटिव्ह संख्या आता 41 वर पोहोचली आहे. या पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात कोण कोण आले याची चौकशी आता आरोग्य विभाग व पोलिस करू लागलेली आहे. त्यामुळे नागपूरकरांनी आता घरातच राहण्याचे योग्य असल्याचे आजच्या या आढळलेल्या कोरोंना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संख्येवरून समजून येत आहे.*
*MLA हॉस्टेल येथे विलगीकरण प्रक्रियेत होते सदर रुग्ण.*
*एकाच दिवशी कोरोनाचे एवढे बाधित रुग्ण आढळल्याची ही पहिलीच वेळ आहे. एकदाच एवढ्या मोठ्या संख्येत कोरोना रुग्ण सापडल्याने जिल्हा प्रशासनावर अतिरिक्त ताण पडला असल्या बाबतची माहिती नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.*
*तर सदर परिस्थितीस ही तोंड देण्यास प्रशासन सज्ज असुन नागरिकांची साथ आवश्यक आहे.शासन प्रशासन आपल्या पुर्ण शक्तीनीशी आपल्या सोबत आहो फक्त आपण स्वतः घरातच राहून प्रशासनास सहकार्य करा अशी विनंती नागपूर महानगर पालिका आयुक्तांनी केली आहे*