*कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास सावनेर उपविभाग सज्ज*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत प्रतिनिधी दिनेश चौरसीया सावनेर*
*सावनेर – कोरोना वायरस चा प्रादुर्भाव नागपूर शहरात वाढत असून आज वर एकूण 44 रुग्णांची नोंद झाली असल्यामुळे नागपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्याला रेड झोन घोषित करण्यात आले आहे*
*सदर काळ हा प्रशासकीय अधिकार्यांनं करिता सदु्ष्य अनिबानाचा काळ असल्यासारखा आहे छोटीशी चुक जरी झाली तर त्याची मोठी किम्मत मोजावी लागणार याच अनुशंगाने सावनेर उपविभागात उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार दिपक कारंडे व सावनेर,खापा,केळवद,खापखेडा येथील पोलीस अधिकारी,मुख्याधिकारी सोबतच वैद्यकीय अधिकारी, खाजगी डॉक्टर,पेट्रोल पंप धारक,व्यापारी संघ इत्यादी च्या वेगवेगळ्या बैठकी घेऊण (कोवीड़ 19) कोरोना वायरस चा वाढता प्रादुर्भाव व रस्त्यावर उतरणारी गर्दी कमी करण्याकरिता किराणा दुकाने व फळ भाजी हे सकाळी 8-00 ते 12-00 या कालावधीत,तर आज पासूनच अती आवश्यक कर्तव्यावर असलेल्या शासकीय,निमशासकीय, कर्मचार्यांना सोबतच कु्षी कार्याकरिताच पेट्रोल व डीझेल ते ही ओळखपत्रे दाखविल्याशिवाय मिळणार नाही सोबतच सावनेर तालुक्यातील आरोग्य केन्द्रात कोवीड़ हेल्थ सेंटर व सहा ठीकाणी कोवीड़ हेल्थ केअर सेंटर ची व्यवस्था करुण संशयित रुग्णांना कोरंटाईन करण्यात येणार असुन,रस्त्यावर विनाकारण उतरणार्या सगळ्याच प्रकारच्या वाहन चालकांवर सक्ती करण्याच्या सुचना पोलीस अधिकार्यांना देण्यात आल्या असुन होऊ घातलेल्या 14 एप्रील बाबा साहेब आंबेडकर जयंती,25 एप्रील पासून सुरू होत असलेला मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सोबतच इतर जयंती व सण नागरिकांनी आपल्या घरीच साजरी करण्याचे आव्हान अपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी नागरिकांना केले आहे*
*अधिकारी कर्मचारी व नागरिकांना विशेष सुचना*
*आज संपन्न झालेल्या बैठकीत अधिकारी/कर्मचारी व नागरिकांना उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिलेल्या विशेष सुचना खालिल प्रमाणे*
*किराणा व फळे,भाजीपाला दुकाने सकाळी 8-00 ते 12-00 वाजता पर्यंत दररोज औषधालय व डाँक्टर वगळता*
*किराणा व्यवसाई आपल्या ग्राहकांना घरपोच उपलब्ध करुण देणार असल्याचे व्यापारी संघचे आश्वासन*
*दि.13 एप्रिल पासून अती आवश्यक कर्तव्यावर असलेले केन्द्र व राज्य शासनाचे शासकीय,निमशासकीय अधिकारी/कर्मचारी,शेती उपयोगी यंत्रे,व वाहने तेसच केन्द्र शासन निर्धारीत संस्था धारकांना वगळता इतर सामान्य नागरिकांना पेट्रोल पंप वरुण पेट्रोल डिझेल च्या विक्री थांबविण्यात आली आहे*
*अति आवश्यक कार्यास पेट्रोल डीझेल ची आवश्यकता भासल्यास तालुका पुरवठा अधिकारी यांना रितसर अर्ज करुण लागणारे डीझेल पेट्रोल उपलब्ध करुण देण्याची सोय*
*तालुक्यातील आरोग्य केन्द्रात कोवीड़ हेल्थ सेंटर व सहा कोविड़ हेल्थ केअर सेंटर व कोरंटाईन सेंटर ची व्यवस्था*
*रस्त्यावर विणाकारन उतरून गर्दी करणार्या दुचाकी ,चार चाकी वाहन व वाहन चालंकावर सक्तीची कारवाई करण्याच्या सर्व पोलीस अधिकार्यांना सुचना.*
*तालुक्यातील बिना रेशन कार्ड धारकांना मा.जिल्हाधिकारी साहेब यांचे दिशानिर्देशा नुसार घर पोहच जिवन आवश्यक वस्तु पोहचविण्याचे मुख्याधिकारी,विस्तार अधिकारी व आर आय यांना सुचना*
*14 एप्रिल भारतरत्न बाबा साहेब आंबेडकर जयंती तसेच 25 एप्रील पासून सुरु होत असलेला मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान,अक्षय त्रितीया,महात्मा बसेश्वर जयंती इत्यादी सण नागरिकांनी आपल्या घरीच साजरे करावे.रस्त्यावर गर्दी केल्यास जमावबंदी कायद्या अंतर्गत गुन्ह्याची नोद*
*सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत मोक्याच्या ठीकाणी बँरेकेटींग करुण रस्त्यावरील गर्दी कमी करणे*
*खाजगी डॉक्टरांना आप-आपल्या ओपीडी सुरू करणे तसेच आवश्यक असल्यास शासकीय आरोग्य केन्द्रास सेवा पुरविने*
*सह अनेक उपाययोजना आखण्यात आल्या असुन यांना तात्काळ स्वरुपात क्रियावंत करण्याच्या सुचना देण्यात आल्या असुन नागरिकांनी या परिस्थितीत शासनास मदत करावी असे आव्हान करण्यात आले आहे*
*याप्रसंगी तहसीलदार दिपक कारंडे,सावनेर पो.स्टे.चे पोलीस निरिक्षक अशोक कोळी,केळवद पो.स्टे.चे सुरेश मट्टामी,खापा पो.स्टे.चे ठाणेदार ऐकरे,खापरखेडा पोस्टे चे ठाणेदार सावनेर नगर पालिकेचे मुख्याधिकारी रविन्द्र भेलवे,नायब तहसीलदार चैताली दराडे,जयसिंग राठोर,व्यापारी संघाचे अध्यक्ष विनोद जैन,सचिव मनोज बसवार व पदाधिकारी,आयएमए चे अध्यक्ष डॉ प्रवीण वाकोडे,सचिव परेश झोपे,व पदाधिकारी,सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तेजसिंग सावजी व पदाधिकारी,पत्रकार बंधू प्रामुख्याने उपस्थित होते*