“कोरोनाचे भय” गावकर्यांत रस्ते बंद करण्याची चढाओढ
गावात मात्र शासन नियमांची ऐशीतैशी/ही बाब कितपत योग्य आपणच ठरवा
कोरपना प्रतिनिधि-गौतम धोटे
कोरपना :-“कोरोना” व्हायरसने अख्खा देश हादरला असून या विषाणूचा संसर्गापासून वाचवण्यासाठी सेनीटायजर व मास्कचा वापर करणे वेळोवेळी साबनाने हात धुवणे,योग्य सुरक्षित अंतर ठेवणे अशाप्रकारच्या विवीध उपाययोजना केल्या जात आहे.तर लोकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी शासनप्रशासन रात्रंदिवस जीवाचे रान करून कोरोनाशी लढा देत आहे.असे असतानाच शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन न करता केवळ शहराला जोडणारे मुख्य रस्ते बंद करण्याची चढाओढ गावकर्यांत लागल्याचे चित्र असून गावात येणाऱ्या रस्तयांवर चक्क काट्या,झाडांचे मोठमोठे खोड तर काही ठिकाणी ट्रॅक्टर,बैलबंड्या लावून येण्याजाण्यास मज्जाव केला जात आहे.चंद्रपूर जिल्ह्याची सीमाबंदी करण्यात आली असून आता गावबंदी कशासाठी हा मात्र विचार करणारा विषय आहे.थुट्रा ते गडचांदूर,नांदा ते कोरपना तालुक्याला जोडणारा रस्ता राजूरगुडा येथे बंद,राजूरगुडा ते लालगुडा रस्ता बंद अशाप्रकारे कित्येक गाववासीयंनी मुख्य रस्त्याला जोडणारे रस्ते बंद केले आहे.यासंबंधी विचारले असता “कोरोना” गावात येऊ नये यासाठी अशाप्रकारे उपाययोजना करण्यात आल्याची माहिती सदर प्रतिनिधीला नागरिकांनी दिली आहे. गावाचा फेरफटका मारला तर सोशल डिस्टंसींग,मास्क इतर बाबींना सपशेल तिलांजली दिली जात असल्याचे दिसून आले असून ही बाब कितपत योग्य हे आता संबंधित अधिकाऱ्यांनीच ठरवावी असे मत व्यक्त होत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावकर्यांची सतर्कता कौतुकास्पद असून रस्ताबंदीसाठी काट्या,ट्रॅक्टर व बैलबंड्याचे वापर करण्यापेक्षा आडवी दोरी बांधून येणाऱ्या जाणाऱ्यांची योग्य चौकशी करून सोडले पाहिजे.अशाप्रकारे रस्ताबंदी केल्याने कमी अंतरावर असलेले बैंक,औषधी, दवाखाने,किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी लोकांना फेरा घालून शहर गाठावे लागत असल्याने मार्ग बंद करणे अनुचित नाही का ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून हा प्रकार थांबवण्याची मागणी वजा विनंती अनेकांनी केली आहे.आता यासंबंधी संबंधित विभाग काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
घरिच रहा/स्वच्छ रहा