लॉकडाऊन आता पुढील ३ मे पर्यंत वाढ : नरेंद्र मोदी
२० एप्रिल पर्यंत सर्व राज्यांचे मूल्यांकन केले जाईल
*’…तर सूट दिली जाऊ शकते’*
कोरोना महामारी पासून लढण्यासाठी देशातील सर्व नागरिकांनी यशस्वी लढा दिल्याबद्दल सर्व नागरिकांची प्रधानमंत्री यांनी स्तुती केली….
२० एप्रिल पर्यंत सर्व राज्यांचे मूल्यांकन केले जाईल…आणि लॉक डाऊन अधिक सक्तीचे केले जाईल…आणि विशेषतः हॉट स्पॉट क्षेत्रावर अधिक लक्ष दिले जाईल असे…प्रधानमंत्री यांनी सांगितले…
देशातील सर्व नागरिकांनी या प्रसंगी सोसल distansing चे पालन करावे…आरोग्य सेतू या app द्वारे आपण स्वतची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी,आणि कोरोना ला हारवण्यासाठी कार्यरत योध्यांचा सन्मान करावा असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले….
नई दिल्ली– देशव्यापी लॉकडाऊनच्या २१ व्या दिवशी करोनाबाधितांची संख्या १०३६३ वर पोहचली आहे. करोनामुळे ३३९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत तर १०३६ जणांवर उपचार यशस्वी ठरलेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा कालावधी देशात ३ मेपर्यंत वाढवण्यात येत असल्याची घोषणा केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा अखेरचा दिवस आहे. या दिवशी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम राहणार असल्याचं जाहीर केलंय. करोना हॉटस्पॉट वाढले नाही तर नियम शिथील करण्यात येतील, असा दिलासाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना दिलाय. २० एप्रिलपर्यंत प्रत्येक प्रदेशाचं मूल्यांकन केलं जाणार आहे. जे प्रदेश करोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होतील तिथले नियम शिथील केले जातील,असंही त्यांनी म्हटलंय. पंतप्रधान मोदी यांचे राष्ट्राला उद्देशून संबोधन.
२० एप्रिल पर्यंत सर्व राज्यांचे मूल्यांकन केले जाईल
*’…तर सूट दिली जाऊ शकते’*
करोनाला कोणत्याही परिस्थितीत नवीन ठिकाणी वाढू द्यायचं नाही. स्थानिक स्तरावर एकही रुग्ण वाढला किंवा करोना रुग्णाचा मृत्यू झाला तर ही आपल्यासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. त्यामुळे आपल्याला करोना हॉटस्पॉटवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतर्कता ठेवायलाच हवी. ज्या ठिकाणीही रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. नवे हॉटस्पॉट आपल्या परिश्रमांना आव्हान देऊ शकतात, नवे संकट निर्माण करू शकतात. त्यामुळे पुढचा एक आठवडा करोनाविरुद्धच्या लढाईत कठोरता आणखी वाढवण्यात येईल. २० एप्रिलपर्यंत प्रत्येक भाग, प्रत्येक स्टेशन, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक राज्यांतील आकडेवारीचं बारकाईनं मूल्यांकन केलं जाईल. जे क्षेत्र या अग्निपरिक्षेत यशस्वी होतील, जिथं हॉटस्पॉटमध्ये वाढ होणार नाही तिथे काही सूट दिली जाऊ शकते. परंतु ही परवनागी सशर्त असेल. बाहेर पडण्याचे नियम अतिशय कडक असतील. लॉकडाऊनचे नियम तोडले गेले आणि करोनाचे रुग्ण आढळले तर सगळी शिथीलता परत घेतली जाईल. त्यामुळे आपण स्वत: बेजबाबदारपणा करता कामा नये आणि कुणाला करूही देता कामा नये, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.