शासनाने ग्रामीण वार्ताहराना मदतीचा हात द्या…
मोवाड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे
कोरोना विषाणूच्या संकटाने सारे जग व्यापले आहें शासनाने आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी,पोलीस कर्मचारी, विदयुत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण कवच दिले आहें त्याचबरोबर कोरोना विषाणू च्या लाँकडाऊन काळात सेवा देणारे व जनतेपर्यंत खरी माहिती पोहोचवनारे, जनजागृती, करणारे जीवाची परवा न करणारे, आपला जीव धोक्यात टाकून काम करणारे ग्रामीण वार्ताहर यांना सुद्धा शासनाच्या सुविधाचा लाभ देण्यात यावा. त्यांना शासनाकडून रार्शन दुकानातुन गहू, तांदूळ, साखर, दाळ, इत्यांदि वस्तू निशुल्क शासनाकडून देण्यात याव्या एस. टी. बस सेवा, तसेच विमान सेवा मध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात यावी. मासिक पगार किंवा मानधन देण्यात यावे. सुरक्षा विमा कवच पॉलिसी जाहीर करावी. समाजसेवेसाठी धावणाऱ्या या घटकाचा शासनाने विचार करून त्याच्या परिवाराना आधार देण्यासाठी शासनाने मदत करावी अशी मागणी समस्त ग्रामीण वार्ताहरानी केली आहें…..