*पारधी बेड्यावरिल गावठी दारु भट्टीवर धाड टाकुन दहा लक्ष रुपयाची नासधुस*
*सहा आरोपींवर गुन्हा दाखल*
*मुख्य संपादक किशोर ढूंढेले सोबत विशेष प्रतिनिधी कळमेश्वर*
*कळमेश्वर पोलीसांनी दारु काढणा-या व विक्री करणा-या इसमांवर वारंवार रेड करुन मुस्के आवरले*
*ठाणेदार पेालीस स्टेशन कळमेश्वर, नागपूर ग्रामीण यांचे धाड सत्र*
कळमेश्वर -*पेालीस स्टेशन कळमेश्वर हद्दीत मौजा निमजी येथील पारधी बेडयावर काही ईसम घरी मोहाफुलाची गावठी दारू तयार करतात अशी गोपनीय बातमीदाराकडुन मिळालेली माहीतीप्रमाणे आज दिनांक 15/04/2020 रोजी श्री.अशोक सरंबळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, सावनेर विभाग व ठाणेदार श्री.मारोती मुळूक, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कळमेश्वर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, मनोज खडसे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश गावंडे, शरद गायकवाड, एएसआय दिली सपाटे, ईश्वर धुर्वे, पोलीस हवालदार प्रकाश उईके, चंद्रशेखर सावध, मन्नान नोरंगाबादे, सुनिल कामडी, नाईक पोलीस शिपाई ललीत उईके, अनिल जांभेकर, पोलीस शिपाई राजेश कुमरे, रवि मेश्राम, निलेश उईके, संजु नट, आशिष बोरकर, तुषार भोयर, महिला पोलीस शिपाई ज्योती नेवारे, कुंदा निशाने, कांचन शेंद्रे, प्रियंका नंदेश्वर यांनी मौजा निमजी येथील पारधी बेडयावर गावठी दारु तयार करण्यात आलेल्या ठिकाणी छापा टाकुन कार्यवाही केली. सदर कार्यवाहीमध्ये 4,800 लीटर मोहाफुल रसायन सडवा किंमत 9,60,000/- रुपये व 76 लीटर मोहाफुल दारु किंमत 22,800/-रुपये तसेच मोहाफुल दारु काढण्याचे साहीत्य किंमत 21,150/-रुपये असा एकुण 10,03,950/-रुपयाचा माल जप्त करुन कार्यवाही करण्यात आली.*
*सदरच्या कार्यवाही मध्ये आरोपी 1) सनि मारवाडी, रा.निमजी खदान, पारधी बेडा, ता.कळमेश्वर, जि.नागपूर , 2)वैशाली माहुरे, रा.निमजी खदान, पारधी बेडा, ता.कळमेश्वर, जि.नागपूर ,3) श्रीमती दुर्गा पवार, रा.निमजी खदान, पारधी बेडा, ता.कळमेश्वर, जि.नागपूर, 4) श्रीमती मधु पवार, रा.निमजी खदान, पारधी बेडा, ता.कळमेश्वर, जि.नागपूर, 5) श्रीमती आरती मारवाडी, रा.निमजी खदान, पारधी बेडा, ता.कळमेश्वर, जि.नागपूर, 6) श्रीमती संगीता मारवाडी, रा.निमजी खदान,पारधी बेडा,ता.कळमेश्वर, जि.नागपूर विरुध्द कलम 65(फ),(ब),(क),(ई) महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.*