*ब्रेकींग न्यूज* *पाण्याच्या टाकीत मृत माकड..* *दूषित पाणी पुरवठ्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती…* *पाटणसावंगी गावात खळबळ….*

*ब्रेकींग न्यूज*

*पाण्याच्या टाकीत मृत माकड..*

*दूषित पाणी पुरवठ्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती…*


*पाटणसावंगी गावात खळबळ….*


*ग्रामपंचायत प्रशासनाची लापरवाही..*

*विशेष प्रतिनिधी पाटणसावंगी.*

*देशात कोरोनाने थैमान घातले आहे त्या कारणाने सर्वच नागरिक स्वछता व आरोग्याची काळजी घेत आहे. त्यातच स्थानिक ग्रामपंचायततर्फे नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत माकड पडून मेल्याने काही दिवस दूषित पाणीपुरवठा झाल्याची दुर्दैवी घटना येथे आज उघडकीस आल्याने खळबळ उडाली.व आरोग्याच्या चिंतेने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.*

*संपूर्ण गावाला पाणीपुरवठा होत असलेल्या पाण्याच्या टाकीत मृत माकड सापडल्याची खळबळजनक घटना गावात घडली आहे. आज शुक्रवारी सकाळी दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी नळाद्वारे आल्याने काही नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रार केली. पाण्याच्या टाकीची तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर ग्रामपंचायतच्या वतीने कोणालाही न कळता गुप्त पद्धतीने टाकीतून मृत माकडाची विल्हेवाट लावण्यात आली तर पाण्याच्या टाकीचे तात्काळ शुद्धीकरण करण्यात आले आहे*

*दरम्यान, पाण्याच्या टाकीतून ज्या ज्या प्रभागात पाणीपुरवठा झाला, व दूषित पाणी पिल्याने जे ग्रामस्थ आजारी पडले तर त्याला जवाबदार कोण असा नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.*

*ग्रामपंचायत कार्यालय परिसरात दिढ लाख लिटर क्षमतेची पाण्याच्या दोन टाकी आहे. त्यातील माकड पडलेली पाण्याची टाकी ही 1972 मध्ये निर्माण केलेली असून जीर्ण आहे. या टाकीवरचे झाकणं ही सडके होते. या टाकीतून संपूर्ण गावात पाणीपुरवठा होतो. शुक्रवारी या टाकीतील पाणी गढूळ येत असल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी केली होती तर पाण्याला दुर्गंधी येत असल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या टाकीची तपासणी केली. यावेळी टाकीचे झाकण नसल्याचे दिसले. तर टाकीत मृतावस्थेत माकड दिसून आले. त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनामार्फत कुणालाही न कळता मृत माकडाची विल्हेवाट लावण्यात आली. ही बाब हळूहळू सम्पूर्ण गावात पसरली आरोग्याच्या चिंतेने लोकांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन रोष व्यक्त केला.नागरिकांनी बॉटल मध्ये दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी भरून सरपंच अजय केदार व ग्रामविकास अधिकारी बबन शृंगारे व कर्मचाऱ्यांना दाखवत रोष व्यक्त केला. संपूर्ण गावात नळाद्वारे आलेले पिण्याचे व वापराचे पाणी नागरिकांनी फेकले. लॉकडाउनमुळे महिनाभरापासून बंद असलेल्या ऍक्वा फिल्टर पाण्याचे तिन्ही दुकानासमोर गर्दी दिसून आली. त्यानंतर टाकीचे शुद्धीकरण करण्याचे काम करण्यात आले. ही टाकी 15 जानेवारी 2020 या तारखेला स्वच्छ करण्यात होती.आठवड्यात एकदा पाण्याची टाकी स्वच्छ करावी व नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.*

*हल्ली उन्हाळा सुरू झाला आहे रानात काहीही मिळत नसल्याने गावात खाण्याच्या व पाण्याच्या शोधात माकडाची टोळी येत असते. काही दिवसांपूर्वी तहानलेल्या माकडाने पाण्याच्या शोधात मोडके झाकण पाहून आत टाकीत प्रवेश केला व तेथेच मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडल्याचा अंदाज आहे. माकड संपुर्ण सडून व गळून नळाद्वारे घरोघरी पिण्याच्या पाण्यात गेले. सडके मास , केस व दुर्गंध युक्त पाणी घरोघरी पोहोचले.*

*चौकशी करून या घटनेत दोषी आढळल्यास दोषीवर उचित कारवाही करण्यात येईल.असे सावनेर चे खंड विकास अधिकारी अनिल नागने यांनी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन सांगितले.*

*दूषित पाणी पिल्याने गॅस्ट्रो होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी लक्षणं आढळल्यास तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात यावे तेथे योग्य तो उपचार करण्यात येईल अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ अनुपमा मेश्राम प्रा आ केंद्र पाटणसावंगी यांनी दिली.*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …