*नागरिकांच्या सुरक्षेसाठी लॉकडाउन आवश्यकच – पालकमंत्री विजय वडेट्टीवार*

*नागरिकांच्या सुरक्षेसाठी लॉकडाउन आवश्यकच – पालकमंत्री विजय वडेट्टीवार*

*कोरोना संचार बंदीबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठक*

गडचिरोली प्रतिनिधी-सूरज कुकुडकर

*गडचिरोली– : शासनाची भूमिका लॉकडाउन करुन जनतेला अडचणीत आणण्याची नसून ती सुरक्षेकरीता आहे, याबाबत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा असे आवाहन जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केले. गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना संसर्ग व त्याबाबत लागू केलेल्या संचार बंदीच्या अनुषंगाने त्यांनी बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात केले होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, जिप सदस्य ॲड.रामभाऊ मेश्राम तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, स्थलांतरीत लोकांची व्यवस्था याबाबत आढावा घेतला. प्रशासनाने केलेल्या संचारबंदीच्या कामामुळे व लोकांच्या सहकार्याने जिल्हा कोरोनामुक्त राहिला आहे. यापुढेही आपल्याला ही लढाई सुरु ठेवायची आहे. या दरम्यान काही लोकांना अडचणी निर्माण होत आहेत. मात्र प्रशासन यासाठी आवश्यक मदत वेळेत पोहचवित आहे. जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंचा पूरवठा पुढेही अखंड सुरु राहिल याकरीता नागरीकांनी काळजी करु नये असे आवाहन त्यांनी बैठकित केले.

*शेतीविषयक कामांना अडथळे नाहीत* – जिल्ह्यातील शेतीविषयक कामांना कोणत्याही प्रकारे प्रशासनाकडून बंधने नाहीत. शेतकऱ्यांनी शेतीविषयक कामे करावीत. फक्त यामध्ये अकारण गर्दी टाळा व कोरोना संसर्गाला दूर ठेवा असे पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले. तेंदू पत्ता कामे सुरू करण्याबाबत परवानगी : संचार बंदीमुळे सर्वच कामांना बंदी घालण्यात आली होती. तेंदू पत्ता संकलन जिल्हयातील महत्वाबाचा व्यवसाय असून त्याबाबत आता परवानगी देता येईल असे त्यांनी बैठकीत सूचना केल्या.

*जीवनावश्यक वस्तूबाबत चिंता करु नका*- जिल्ह्यात मुबलक जीवनावश्यक वस्तूंचा साठा आहे. याबाबत नागरीकांनी चिंता न करता प्रशासनाच्या सूचनेचे पालन करुन खरेदी करा. घराबाहेर पडून गर्दी करु नका. जीवनावश्यक वस्तू मोठया प्रमाणात असल्याने त्या वेळेत आपल्याला उपलब्ध होतील. जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी संचारबंदी योग्य प्रकारे राबवूया असे त्यांनी सांगितले.
रेशनींग मधून मिळणारे धान्य वेळेत मिळणेबाबत प्रशासनाला त्यांनी यावेळी सूचना केल्या. यामध्ये जिल्ह्यातील गरजू लोकांना आवश्यक व शासनाने मंजूर केलेले धान्य वाटप होण्यासाठी व त्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या. दुर्गम भागात रेशन धान्य पावसाळया आधी पोहचविणे करीताही उपाययोजनांबाबत त्यांनी यावेळी आढावा घेतला.

*जिल्ह्यात येणारे सर्व रस्ते बंद ठेवा*- प्रशासनाच्या परवानगीशिवाय जिल्ह्याबाहेरील व्यक्ती आत येता कामा नये. याबाबत पालकमंत्री यांनी पोलीस प्रशासनाला सूचना केल्या. जिल्हा कोरोना मुक्त राहण्यासाठी बाहेरील व्यक्ती आत येता कामा नये. जिल्ह्यात येण्यासाठी गरजूंच्या कारणांची छाणणी करा. अत्यावश्यक कारण असेल तरच त्यांची तपासणी करुन प्रवेश देण्यात यावा असे त्यांनी यावेळी पोलीस अधिक्षक यांना सांगितले.
शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्ह्याबाहेर राहू नये, जर असे लोक बाहेरुन आले तर त्यांना क्वारंटाईन केले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

*शेतकऱ्यांना 7/12 घरपोच देण्यासाठी योजना* – पालकमंत्री यांनी ऑनलाईन स्वरुपात 7/12 मिळत नसल्यास त्यांना घरपोच तो उपलब्ध करुन देण्यासाठी योजना तयार करा अशा सूचना केल्या. यामुळे जिल्ह्यातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शेतीविषयक कर्जासाठी मदत मिळणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी तहसिलदार यांच्याशी चर्चा करुन याबाबत गरजूंना 7/12 घरपोच देणेकरीता नियोजन करणार आहेत.

*नगरपरिषद क्षेत्रातील कामे तातडीने पुर्ण करा* : जिल्हयात नगरपरिषद क्षेत्रात असलेली रस्ते, वीज पाणीपुरवठा अशी कामे जलदगतीने करणेबाबतच्या सूचना पालकमंत्रयांनी दिल्या. अत्यावश्यक सेवेमध्ये येणारी कामे जलदगतीने पुर्ण करून ती गुणवत्तापुर्वक कशी होतील याबाबत संबंधित नगरपरिषदेने लक्ष घालावे असे ते म्हणाले.

*राष्ट्रीय महामार्गाच्या कामांबाबत प्रशासनाला सूचना* : जिल्हयातून जाणा-या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेले कित्येक दिवस बंद आहे. आता 20 एप्रिलनंतर सर्व कामे गतीने सुरू करून महामार्ग विना अडथळा वाहतूकीसाठी खुला करून द्यावा असे निर्देश संबंधित विभागाला त्यांनी दिले. यामध्ये विनाकारण सामान्य लोकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. यावेळी पालकमंत्री महोदयांनी अपघात झाल्यास संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्या.

या बैठकीत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी संचार बंदीच्या अनुषंगाने तयारीबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली. तर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी बंदोबस्ताबाबत माहिती दिली.

****

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …