*पालकमंत्री डॉ नितीन राउत यांचा उपविभागाचा दौरा*
*कोणीही उपाशी राहू नये काळजी घ्या*
*उपविभाग सावनेर तसेच महसूल, पोलीस,आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाच्या कार्याबद्दल समाधान*
*प्रतिनिधी सुरज सेलकर/दिनेश चौरसीया सावनेर*
*सावनेर ः नागपूर जिल्हाचे पालकमंत्री डॉ नितीन राउत यांनी आपल्या ताफ्यासह संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील उपविभागीय व तहसील कार्यालयाचा दौरा करुण “कोवीड़ 19” कोरोना वायरस या आणीबाणीच्या परिस्थितीचा आढावा घेत.केन्द्र व राज्य शासनाने निर्गमीत केलेल्या दिशानिर्देश तसेच उपाययोजनांचे गांभीर्याने पालन करुण कुणीही उपाशी राहणार नाही यावर विशेष लक्ष देत,सुरक्षित अंतर,तसेच सार्वजनिक ठीकाणी मास्कचा वापर व शहरा-शहरात किटनाशक फवारणी यावर वरच्यावर लक्ष देण्याचे तसेच याप्रसंगी प्रशासनास मदत करणार्या आदासा गणपती मंदिर ट्रस्ट, सावनेर तालुका मराठी पत्रकार संघ,आयएमए,प्रयास टिम,सावनेर कु्षी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी संघटना,केळवद येथील सामाजिक संस्था सोबतच इतर संस्थांचे आभार मानत,ज्या नागरिकांन जवळ शिधापत्रिका नाही अथवा रद्द झालेल्या आहे त्यांना सुद्धा याप्रसंगी अन्न धान्य वाटप करण्यात यावे तसेच अश्या लोकांना शासनाच्या या योजनेची माहीती व लाभ मिळवून देण्याकरिता सामाजिक संस्था,जनप्रतिनिधी व समाजसेवींनी पुढाकार घ्यावा अशी विनंती करण्यात आली*
*दररोज नागपूर जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची सख्या वाढत असुन सुध्दा शहरी व विशेषतः ग्रामीण भागात रस्त्यावर वाहतूक व नागरिकांची वाढत असलेली गर्दी चिंतेचा विषय आहे याकरिता स्थानिक प्रशासन,पोलीस प्रशासन व संबंधित विभागाने याची दखल घेऊन रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे अश्या सुचना देण्यात आल्या*
*याप्रसंगी स्थानिक आमदार, महाराष्ट्र शासनाचे दुग्ध,पशुसंवर्धन व युवा कल्याण मंत्री सुनील केदार,रामटेक लोकसभा नीर्वाचन क्षेत्राचे खासदार कु्पाल तुमाणे,नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे,राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक,पंचायत समिती सावनेर च्या सभापती प्रामुख्याने उपस्थित होत्या*
*सावनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सावनेर तालुक्याची अद्यावत स्थिती आपल्या प्रास्ताविकातून उपस्थित मान्यवरांच्या समक्ष प्रास्ताविकातुन प्रस्तुत केली तर स्थानिक तालुका प्रशासनाचे तहसीलदार दिपक कारंडे,नायब तहसीलदार चैताली दराडे,जयसिंग राठोड,मुख्याधिकारी रवींद्र भेलावे,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सरंबळकर,सावनेर पो.स्टे.चे ठाणेदार सोबतच महसूल विभागाचे कर्मचारी, अधिकारी सोबत जिल्हा परिषद सदस्या ज्योती सिरसकर,पंचायत समिती सदस्य,नगरसेवक सह अनेक गनमान्य उपस्थित होते याप्रसंगी ज्यांचे जवळ शिधापत्रिका नाहीत अश्या गरजूंना पालकमंत्री डॉ नितीन राउत यांच्या हस्ते शासनाव्दारे प्राप्त जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले व सदर आयोजनासाठी सोशल डिस्टंसींग वर विशेष भर देण्यात आला हे विशेष*