*SMS पाठवा आंदोलनास प्रचंड प्रतिसाद, परिषदेकडून सर्वांचे आभार व्यक्त*
मुख्य संपादक- किशोर ढूंढेले
मुंबई :मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या SMS पाठवा आंदोलनास आज राज्यभरातून प़चंड प्रतिसाद मिळाला.. अजित पवार, अनिल देशमुख आणि अजोय मेहता या तीन मान्यवरांना राज्यभरातून हजारो SMS पाठविण्यात आले.. या निमित्तानं पुन्हा एकदा पत्रकार परिषदेच्या शक्तीचे दर्शन सर्वांना झाले.. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी राज्यातील तमाम पत्रकार आणि आंदोलनास सहकार्य करणारया सर्वांचे आभार मानले आहेत..
मुख्य सचिव अजोय मेहता यांनी काल एक फतवा काढून वृत्तपत्रांचे वितरण करण्यास प़तिबंध घातला आहे.. माध्यम स्वातंत्र्यावरचा हा हल्ला आहे,अशी जनतेची भावना झाली होती.. मराठी पत्रकार परिषदेने याची गंभीर दखल घेत तातडीने एक निवेदन मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री आणि मा. उपमुखयमंत्रयांना पाठविले.. आणि वृत्तपत्र वितरणावर चे निर्बंध हटवावेत अशी मागणी केली.. त्यानंतर परिषदेच्या पदाधिकरयांची एक बैठक झूम अॅप च्या माध्यमातून घेण्यात आली.. सध्या लॉकडाऊन असल्यानं आंदोलनाचा अन्य कोणताही मार्ग अवलंबिता येणे शक्य नसल्याने सरकारला हजारो एसएमएस पाठवून आपल्या तीव्र भावना कळवावयात असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.. त्यानुसार प्रत्येक जिल्हयातून किमान 100 SMS पाठविले जावेत असे नियोजन करण्यात आले.. मात्र राज्यभरातून हाती आलेल्या रिपोर्टनुसार अनेक जिल्हयातून 100 पेक्षा कितीतरी पटीने जास्त एसएमएस पाठविले गेले.. 5000 पेक्षा जास्त SMS पाठविले गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे.. मराठी पत्रकार परिषदेच्या आवाहनानुसार समविचारी पत्रकार संघटना आणि व्यक्तींनी आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदविला.. सरकारने या भावनांची दखल घेतली नाही तर मराठी पत्रकार परिषद सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाण्याचा विचार करीत असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले..
परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी,राज्य महिला संघटक जान्हवी पाटील, राज्य प़सिध्दी प्रमुख अनिल महाजन यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांना धन्यवाद दिले आहेत.. परिषद हा लढा विजय मिळेपर्यंत विविध मार्गानी लढत राहील असा निर्धारही परिषद पदाधिकारयांनी व्यक्त केला आहे…