अनुलोम संस्थेच्या समता सामाजिक मंडळ मोवाड कडून गरजुना जिवनावश्यक किट वाटप
मोवाड प्रतिनिधी -श्रीकांत मालधुरे
मोवाड – अनुलोम ही गरजु लोकांनाच्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करत आहेत . त्याचीच एक सेवा कार्यची प्रचिती म्हणून( एक हात गरजूंना व अंपगाना मदतीचा ) या म्हणी प्रमाणे आज वर्तमान परिस्थिती भारत देशा वर महाभंयकर कोरोना विषाणूच्या संकटात सापडलेल्या गरीब ,अंपग,म्हातारे व गरजु लोकांना आज दोन वेळचे जेवण मिळणे खूप कठीण होत आहे.अशा परिस्थितीत दिनांक २०/४/२०२० ला जिवनावश्यक लागनारा किराणा १५ गरजू कुटुंबाना देण्यात आला. यावेळी अनुलोम संस्थेचे सुनील धांडे काटोल भागजनसेवक ,वस्ती मित्र श्रीकांत मालधुरे,पुरूषोत्तमजी राऊत,निलेश गुरु हे सामाजिक कार्यकर्ते या सर्वानी स्वइच्छेने आर्थिक योग्य दान देऊन सहकार्य केले व विरेंद्र लक्षणे,दिनदयाल वैघ स्थान मित्र ,अनिल ढोके या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले तसेच यावेळी तोंडला योग्य प्रकारे मास्क लावून व सेनेटायज करून आणि सोशल डिस्टनसिंगचे व नियमचे काटेकोर पालन करून वरील उपक्रम राबविले