कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धान्यकीट वाटपात पक्षपात
विरोधी पक्ष नगरसेवक डोहेंचा न.प.वर आरोप
खऱ्या गरजूंना डावलून ,न, गरजूंना वितरण
विशेष प्रतिनिधी- गौतम धोटे
कोरपना :-“कोरोना” च्या धर्तीवर या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे.त्यामुळे गोरगरीब मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे.काही रेशन कार्ड धारकांना धान्य देण्याची व्यवस्था शासनाने केली.पण ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशा कुटुंबांसाठी शासनाकडून उल्लेखनीय अशी व्यवस्था झाली नाही त्यामुळे काही सामाजिक संस्था,कंपनी,सामाजिक कार्यकर्ते व इतर पक्षांकडून मदत पुरवली जात आहे.याचप्रमाणे स्थानिक माणिकगड सिमेंट कंपनीने गडचांदूर नगरपरिषदेला 800 धान्य कीट गोरगरिबांना वाटण्यासाठी दिली असता न.प.मध्ये पक्षपात करून ही संपूर्ण कीट सत्ताधाऱ्यांनी आपल्या हाती घेऊन गरज नसलेल्यांना वाटप करण्यात आले आणि गरजवंत जसेच्या तसेच असल्याचा आरोप गडचांदूर न.प.चे विरोधी पक्ष नगरसेवक अरविंद डोहे या णी पुढे बोलताना केला आहे.डोहे पुढे बोलताना म्हणाले की मी नगरसेवक असल्याने असे अनेक गोरगरीब माझ्याकडे आले आणि दररोज येत असून त्यांना मी न.प.येथे पाठवले.तेव्हा आमच्याकडे अशाप्रकारे कोणतीही व्यवस्था नाही,ते अध्यक्षांना दिले आहे आणि तेच वाटप करित आहे असे सांगून मुख्याधिकारी यांनी सुद्धा हातवर केले.यासंदर्भात चर्चा केली असता मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला सुद्धा उडवाउडवीचे उत्तर देत म्हणाले की “माणिकगड कंपनीने सदर कीट नगराध्यक्षांकडे दिली आहे माझ्याकडे नाही जर दिली असती तर आम्ही रितसर वाटप केली असती” तरी याठिकाणी अन्न धान्य कीट वाटपात होत असलेली अफरातफर बद्दलची योग्य चौकशी करून कारवाईची मागणी तक्राराद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही करीत असल्याची सुद्धा माहिती नगरसेवक डोहे यांनी दिली आहे.यावेळी नगरसेवक रामसेवक मोरे,संदीप शेरकी,सतीष उपलेंचीवार यांची उपस्थिती होती.विशेष म्हणजे नगरपरिषद नगराध्यक्ष,उपाध्यक्ष तथा काही सत्ताधारी नगरसेवक लोकांचे तोंड पाहून धान्य कीट वाटप करीत असल्याची ओरड सुरू आहे.खऱ्या गरजूंना डावलले जात असल्याने कित्येकठिकाणी अशा कुटुंबांवर उपासमारीचे दिवस काढण्याची वेळ आल्याचे पहायला मिळत आहे.अशा संकटसमयी लक्ष देऊन होणारी उपासमार टाळावी अशी याचना येथील कित्येक गोरगरीब कुटुंबांनी न्यु च्या माध्यमातून मायबाप सरकारकडे केली आहे.