*गुन्हे शाखेची जुगार अड्ड्यावर धाड़*
*11 जुगारी सह 99 हजाराचा एवज जप्त*
विशेष प्रतिनिधी कळमेश्वर
कळमेश्वरः स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीणचे पोलिस निरिक्षक श्री. अनिल जिट्टावार यांना आज दिनांक 21.04.2020 रोजी खात्रीशीर गुप्त माहितगारामार्फत माहिती मिळाली की, लॉकडाउन सुरु असतांना देखील शासनाने आदेशीत केलेल्या संचारबंदीचे उल्लंघन करुन काही इसम हे ब्राम्हनी गावातील एका दर्ग्याजवळ पोलिस ठाणे कळमेश्वर हद्दीत जुगार खेळत आहे. त्याप्रमाणे प्राप्त आदेशानुसार आज दिनांक 21/04/2020 रोजी प्राप्त माहितीची योग्य अशी खात्री करुन दुपारी 03:00 वाजता रेड कार्यवाही केली असता, काही इसम 52 ताशपत्यावर पैशाची बाजी लाऊन हारजीतचा खेळ खेळतांना दिसून आले. पोलिसांना पाहून ते पळू लागताच, पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
1) 16000/- रुपये रोख रक्कम.
2) 8 मोबाइल संच किमती 83000/- रुपये.
3) 52 ताशपत्ते व इतर साहित्य.
अशाप्रकारे एकूण 99,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहेत.ताब्यात घेण्यात आलेले एकूण इसम 11 सर्व रा. कळमेश्वर, जी. नागपुर.नमूद आरोपिंवर पोलिस ठाणे कळमेश्वर येथे कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार कायदा सहकलम 188 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहेत.
सदर कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री. अनिल जिट्टावार यांचे आदेशाने पोउपनि सचिन मत्ते, सफौ जयप्रकाश शर्मा, लक्ष्मिप्रसाद दुबे, नापोशि सत्यशील कोठारे, पोशि प्रणय बनाफर, महेश बिसने व चासफौ साहेबराव बहाळे यांचे पथकाने पुर्ण केली.