*खापरखेडा येथे मोकाट डुकरांचा मुक्त संचार* *रोगराई पसरण्याची शक्यता* *नागरिकांची ओरड मात्र संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष*

*खापरखेडा येथे मोकाट डुकरांचा मुक्त संचार*

*रोगराई पसरण्याची शक्यता*


*नागरिकांची ओरड मात्र संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

चिचोली खापरखेडा ग्रामपंचायत परिसरात मोठया प्रमाणात मागील अनेक महिन्यापासून डुकरांचा मुक्त संचार वाढला आहे यासंदर्भात नागरिकांची ओरड आहे मात्र मुंग गिळून बसलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे त्यामुळे ऐन कोरोना विपीदाच्या काळात रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चिचोली (खापरखेडा) ग्रामपंचायत परिसरात मागील अनेक महिन्यापासून घाणीचे साम्राज्य व मोकाट डुकरांचा मुक्त संचार वाढला असून माणसापेक्षा डुकरांचे वास्तव्य जास्त झाले आहे मोकाट श्वान, डुकरे, गाई किंवा अन्य जनावरे आढळल्यास वारंवार उपाय योजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडुन देण्यात देण्यात येतात मात्र त्या फक्त नावासाठी असतात पुन्हा परिस्थिती जैसे थे त्यामुळे गाव तसं चांगलं आणि वेशीला टांगल अशी गत झाली असून अनेक समस्या याठिकाणी मुक्काम ठोकून आहेत चिचोली (खापरखेडा) ग्रामपंचायतची लोकसंख्या जवळपास 50 हजाराच्या वर आहे मात्र योग्य उपाययोजना व नियोजन नसल्यामुळे येथील नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत अनेक महिन्यापासून चिचोली ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या वार्डात घाणीचे साम्राज्य आहे डुकरांचा मुक्त संचार वाढला आहे सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन नाली साफ सफाई शून्य आहे नाल्या तुडुंब भरल्या आहेत मात्र स्पशेल दुर्लक्ष आहे वार्ड नंबर 4, पाण्यांच्या टाकी जवळ खापरखेडा 100 डुकराचा कळप चा कळप पाहण्याला मिळतात भोवती डुकरांचे लोंढे जमा झाली आहेत मात्र त्यांच्या कडून संबंधितांना दिशा-निर्देश देण्यात आले नाहीत कोरोनाने अख्ख जग आपल्या विळख्यात घेतले आहे देशासह राज्यात रुग्ण वाढल्याने अनेक उपाययोजना करण्यात येत आहे नागपूर जिल्ह्यात रोज नवे रुग्ण आढळून येत आहे त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीकोनातून परिसर हा स्वच्छ असायला हवा यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यायला हवी.
*स्थानिक वीज केंद्र प्रशासनाने जपायला हवी सामाजिक बांधिलकी*
*प्रकल्पग्रस्त गावात सॅनिटाइझरची फवारणी करायला हवी*
खापरखेडा येथे दोन मोठी औष्णिक वीज केंद्र असून एकूण 1340 मेंगावॅट वीज निर्मिती केल्या जाते खापरखेडा औष्णिक वीज केंद्र उभारण्यासाठी परिसरातील गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या आहेत त्यामुळे ते भूमिहीन झाले असून प्रकल्पग्रस्त आहेत अलीकडे स्थानिक वीज केंद्र प्रशासनाने प्रकल्पग्रस्त गावांची यादी जाहीर केली आहे आज परिसरात कोरोना विपीदा परिस्थिती आहे लॉक डाऊन असल्यामुळे सर्व नागरिक आप आपल्या घरात सुरक्षित आहेत त्यामुळे सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन स्थानिक वीज केंद्र प्रशासनाने सॅनिटाइझरची फवारणी करावी अशी मागणी करण्यात येत आहे. 

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …