नागपुर जिल्हा कार्याध्यक्ष पदी चक्रधर गभणे तर प्रा.शैलैश रोशनखेडे यांची नागपुर जिल्हा सचिव पदी निवड
विशेष प्रतिनिधी
रेवराल:-अमरावती येथिल अखिल पत्रकार कल्याण बहूउद्देशिय संस्थेच्या नागपुर जिल्हा कार्याध्यक्ष पदी येथिल चक्रधर तुळशीराम गभणे तर जिल्हा सचिव पदी प्रा.शैलेश रोशनखेडे यांची नियुक्ति करण्यात आली आहे.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरद लक्ष्मणराव मेहरे यांनी जिल्हा अध्यक्ष तुषार कुंजेकर याच्या शिफारशी ने गभने व रोशनखेडे यांना नियुक्ति पत्र दिले आहे.
अखिल पत्रकार कल्याण बहूउद्देशिय संस्था पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्यपातळीवर कार्यरत असणारी संस्था असून राज्यातील विविध जिल्ह्यात संस्थेच्या शाखा आहेत राज्यभरात संस्थेने पदाधिकाऱ्याची नियूक्ती केली आहे
चक्रधर गभणे हे गेल्या ३ वर्षापासून दैनिक लोकमत मध्ये तर शैलेश रोशनखेडे हे ४ वर्षापासून पत्रकारितेत कार्यरत आहेत.दैनिक पुण्यनगरी, विदर्भ मिडीया, त्यांनी नागपुर जिल्ह्यात वार्तांकन केले आहेत वेगळ्या वाटेवरी समाजाभीमुख बातमीदारी हे त्यांच्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य आहे.नागपुर जिल्ह्याचे असंख्य अप्रकाशित यांनी उजेडात आणले आहेत.उत्तम गायीकी, प्राणी-पक्षी प्रेमी सामाजीक कार्यकर्ता, लोकांना वृत्त प्रत्राच्या माध्यमातून न्याय मिळवून देणे अशी त्यांची ओळख आहे.
अखिल पत्रकार कल्याण बहूउद्देशिय संस्थेच्या माध्यमातुन पत्रकारांच्या कल्याणासाठी आणी त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी कार्यरत राहण्याचा मनोदय चक्रधर गभणे व शैलेश रोशनखेडे यांनी व्यक्त केला.त्याचप्रमाणे लवकरच नागपुर जिल्हयातील प्रत्येक तालुक्यासाठी अखिल पत्रकार कल्याण बहुद्देशीय संस्थेची कमेटी बनवीली जाईल असे त्यांनी सांगितले गभणे व रोशनखेडे यांच्या नियुक्तिने जिल्हाभरात कौतुक केले जात आहे. तापेश्वर वैध सभापती जिल्हा परिषद नागपुर, जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख, जिल्हा परिषद सदस्या शालीनी देशमुख, माजी बाजार समितीचे संचालक राजेंद्र लांडे,मौदा ता.काँग्रेस कमेटी अध्यक्ष ज्ञानेश्वर वानखेडे, राकेश बागडे, पंचायत समिती सदस्य स्वप्नील श्रावणकर उपसरपंच शंकर वैध ,माजी ग्रा.पं.सरपंच कैलास वैद्य,इंजि.राजेंद्र रावते ग्रामीण पत्रकार संघ नागपुर सामाजिक कार्यकर्ते मंगेश तलमले, श्रीकांत किरपान,रेवरालचे सरपंच चिंतामण मदनकर,विरसीचे सरपंच किसणा करडभाजने,धनीचे सरपंच ईश्वर पिसे, नांदगाव चे सरपंच बबिता सलामे,व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.