*देशी दारूच्या दुकानात चोरी* *3 आरोपींना अटक*

*देशी दारूच्या दुकानात चोरी*


*3 आरोपींना अटक*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले* :

खापरखेडा:- काल रात्री अज्ञात आरोपींनी खापरखेडा पोलिस स्टेशन अंतर्गत पोटा ग्रामपंचायत परिसरातील लोकप्रिय देसी दारूच्या दुकानात 5880 रुपयांच्या देशी मद्याच्या बाटल्या चोरून नेल्या. गुप्त माहितीच्या आधारे नागपूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आणि आरोपींकडे 750 मिलीलीटर देशी दारूच्या 27 नग बंफर ज्याची किंमत 5886 सांगितली जात आहे तसेच 25000 किंमतीची मोटारसायकल जप्त केली. आरोपी विरुद्ध खापरखेडा पोलिस स्टेशनमध्ये कलम 461, 380 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
१) संतोष फूलचंद वर्मा, वय 36 वर्षे.
२) गोकुळ रामनरेश सहानी, वय २० वर्षे
३) सरफराज असलम अन्सारी, वय ३२ वर्षे
सर्व सिल्लेवाडा कॉलनी, रहिवासी आहे.
कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.अनिल जिट्टावार यांच्या आदेशाप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक सचिन मते, लक्ष्मीप्रसाद दुबे, सूरज परमार, निलेश बर्वे, सत्यशील कोठारे, शैलेश यादव, प्रणय बनाफर, वीरेंद्र नरड आणि साहेबराव बहाळे यांनी सहभाग घेतला.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …