गडचांदूरातील 50 अतिउत्साही नागरिकांना “मॉर्निंग वॉक” पले महागात
अबब 10 नागरिकांवर दंडात्मक कारवाई तर इतरांना समज
विशेष प्रतिनिधि- गौतम धोटे
कोरपना :- “कोरोना”च्या पार्श्वभूमीवर नागरिकांना “घरी रहा,सुरक्षित रहा” असे आवाहन वारंवार शासनप्रशासन स्तरातून होत आहे तरीपण काही अतिउत्साही नागरिक याकडे दुर्लक्ष करून घरी बसण्याऐवजी विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.याच श्रेणीत 23 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास गडचांदूर येथील अंदाजे 50 च्यावर अतिउत्साही नागरिक मॉर्निंग वॉकसाठी जात असताना पोलिसांनी पकडुन त्यांना येथील विदर्भ शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर आपल्या पद्धतीने मॉर्निक वॉकचे धडे दिले.यासंबंधी एकुण 10 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तर इतरांना समज दिल्याची माहिती आहे. यामुळे आता मॉर्निंग वॉक बहाद्दुरांचे धाबे दणाणले असून मॉर्निंग वॉक महागात पडल्याची उपहासात्मक चर्चा सुरू आहे.