*सामाजिक बांधिलकी*
*कोरोना युध्दात “कोविड़” योद्धांमुळे प्रशासकीय भार थोडाफार का होईना कमी होणार*
नागपूर प्रतिनिधी -ज्योत्सना इंगळे
नागपूर –दाक्षिण विभाग प्रभाग 34, लवकुश नगर ते जानकी नगर येथील नागरिकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून या संकटकालीन परिस्थितीत आपण ही काही केले पाहिजे व अहोरात्र झटणाऱ्या पोलीस व स्थानिक प्रशासनाच भार थोडा फार कमी व्हावा या हेतूने आपला जीव धोक्यात टाकत जनतेच्या सेवेसाठी कोविड़ योद्धा म्हणून कार्य करण्याकरिता पुढाकार घेतला आहे*
*हुडकेश्वर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी प्रदिप मोहडिकर,विजय राठोड, तसेच बाळकृष्ण ताकतोडे यांना शिट्टी, टोपी व काठी “कोरोना योद्धा” ओळख म्हणून प्रदान करुण त्यांना ठराविक ठीकाण नेमुन दिलीत. हुडकेश्वर पोलीस स्टेशन येथुन त्यांना नियूक्त करून हि जवाबदारी देण्यात आली. आपण ही देशाचे नागरिक आहोत देश व समाज हितात आपली ही काही जवाबदारी आहे याचा मान ठेवुन यांनी सेवा देण्याच्या हेतूने कोरोना योध्दाचा विडा उचलला आहे व विनाकारण फिरणार्या लोकांना थांबवून त्यांची विचारपुस करूण त्यांना अनावश्यक घरुण बाहेर न निघण्याची व कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्याबद्दल च्या शासन निर्गमीत माहिती देत त्यांना लाँकडाऊन दरम्यान घरीच राहण्याकरिता प्रवु्त्त करत आहेत*
*या कोरोना योद्धांचे कार्य बघून इतरही नागरिक व युवक प्रवु्त्त होऊण जर प्रशासनास सहकार्य केल्यास पोलीस प्रशासनासोबतच स्थानिक प्रशासनावरिर भार नक्कीच कमी होईल असा विश्वास या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तत्पर असलेल्या या कोवीड़ योद्धांनी व्यक्त केला*