शासकीय कर्मचारी वर्गास कार्यालयीन परिक्षेत्रात “लाॕकडाऊन” काळात राहण्यासंबंधी निर्देश देण्याबाबत.
– – सुनिल ठाकरे
नागपुर– राज्यातील “करोना माहामारी” प्रादुर्भाव क्षेत्रात नागपूर जिल्ह्याचा “रेड झोन” मध्ये समावेश असल्याने व नागपूर शहरात संसर्गामुळे दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. शहरातून सर्व ग्रामीण तालूका क्षेत्रात शासकीय कार्यालयत जसे तहसिल कार्यालय, पाणीपुरवठा विभाग, अन्न पुरवठा विभाग, विज पुरवठा केंद्र, पंचायत समिती, महसूल विभाग (पटवारी), ग्रामसेवक अशा विभागात जास्तीतजास्त संख्येने शहरातील कर्मचारी वर्ग ये जा करीत असतो. खरं सागायचं झाल्यासं, प्रत्येक अधिकारी व कर्मचा-याला आपल्या कार्यालयीन स्थळी रहाणे हे नियमाद्वारे बंधनकारक असुनही हे तसे नं करता बाजूच्या मोठ्या शहरात मुक्काम करतात हा अनुभव आहे. एकूण राज्याचा विचार करता शहरे सोडली तर अजून ग्रामीण भाग “करोना माहामारी” मुक्त आहे. परंतु शहरी भागातून ग्रामीण भागात नोकरी निमित्त येणा जाणाऱ्या कर्मचारी वर्गामुळे रोगाचा संसर्ग वाढण्याचा संभाव्य धोका नाकारता येणार नाही. हे येणे जाणे करणाऱ्या शासकिय कर्मचाऱ्यास सुद्धा धोका दायक आहे. कोरोना सारखा संसर्ग “लाॕकडाऊन” कालावधीत भरडल्या जाणाऱ्या ग्रामीण क्षेत्रातील गरीब शेतकरी व शेतमजूरी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य व आर्थिक दृष्टीने बिलकुल परवडणारा नाही.
याद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणीत “रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना विभागाचे नागपूर जिल्हा संघटक श्री.सुनिल ठाकरे यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब,नागपूर जिल्हा यांना विनंती पूर्वक मेल द्वारे पत्र सादर करीत मा. पालकमंत्री (नागपूर) तथा उर्जा मंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य, नागपूर.तसेच मा. गृहमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य, मुंबई.यांना सुद्धा मेल द्वारे कळविण्यात आले असून, जिल्ह्यातील सर्व तालूका स्तरावरील शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या शहरातून येणे जाणे करणाऱ्या कर्मचारी वर्गास नियमानुसार तालूका परिक्षेत्रात उपलब्ध असलेल्या शासकीय अथवा जिल्हा परिषद निवासस्थानात राहून कार्यालय सांभाळण्याचे निर्देश देण्यात यावेत. तसेचं कार्यालयीन स्थळी त्यांची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून शहरातील विविध भागातून ग्रामीण भागात ये – जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून ग्रामीण जनतेला “करोना माहामारी” रोगापासून लांब ठेवण्यास सहकार्य होईल. सदर विषयाचे गांभिर्य व कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका विचारात घेऊन योग्य तो सकारात्मक निर्णय घ्याल व मला त्याबाबतीत अवगत कराल अशी अपेक्षा आहे सदर पत्रात करण्यात आली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना सुद्धा मेल द्वारे कळविण्यात आले त्याच प्रमाणे रस्ते, साधन सुविधा व आस्थपणाचे महाराष्ट्र अध्यक्ष मा.योगेश जी परुळेकर आणि राज्य सरचिटणीस योगेश जी चिले यांना मेल द्वारे कळविण्यात आले आहे.