*जैन बंधूनी तयार केले त्वचा कवच*
*डॉक्टर व नर्स भागिनीना केले वितरण*
*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
खापरखेडा:- कोरोनाने संपूर्ण जग आपल्या विळख्यात घेतले आहे देशासह राज्यात हजारोच्या संख्येत कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे जगात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर ,नर्स, वार्ड बॉय अहोरात्र मेहनत करीत आहेत शिवाय पोलीस व शासकीय निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी झटताना दिसत आहे संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला आहे संचारबंदी सुरू आहे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक असून घरीच राहने सुरक्षित आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक डॉक्टर आणि नर्स प्रयत्नशील आहेत मात्र कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने अनेकांना लागण झाली आहे जिवनदान देणारे डॉक्टर खऱ्या अर्थाने परमेश्वर आहेत त्यांची काळजी घेणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे या संकल्पनेतून खापरखेडा परिसरातील शुभम जैन जैनम जैन या दोन जैन बंधूनी एकत्र प्रयत्न करून डॉक्टर व नर्स भगिनीसाठी त्वचा कवच तयार केले आहे त्वचा कवच तयार करतांना संपूर्ण रूम सॅनिटाइझर करण्यात आली ट्रान्सफर्मार फिल्म, इलास्टिक बेल्ट, कापड, फोमचा वापर करण्यात आला त्वचा कवच चेहऱ्यावर लावल्यामुळे संपूर्ण चेहरा सुरक्षित असतो हे विशेष!
नागपूर महानगर पालिकेच्या रुग्णालयात शुभम जैन यांनी एडिशनल कमिश्नर राम जोशी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ८० त्वचा कवच सुपूर्द केले लवकरच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात वितरित करण्यात येणार आहेत त्याच प्रमाणे चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि नर्स, यांच्यासह स्थानिक डॉ.बारस्कर, डॉ.माहुरे, डॉक्टर केळवदे यांच्या रुग्णालयात त्वचा कवच जैन बंधूंच्या वतीने वितरित करण्यात आले शुभम व जैनमचे वय फार लहान आहे मात्र त्यांनी राबविला उपक्रम इतरांना प्रेरणा देणारा असल्यामुळे परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.