*साठेबाजी करणाऱ्या शासकीय स्वस्त धान्य विक्रेत्यास अटक*
*९० पोत्यातुन ४५०० तांदूळ जप्त*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
सावनेर – मर्यादेपेक्षा अधिक धन्याचा साठा करून काळाबाजार करण्याच्या बेतात असलेल्या स्वस्त धान्य दुकानदारवर सावनेर पुरवठा अधिकारीद्वारे कारवाई करून अटक करण्यात आली चेतन भोजराज दियेवार (३५) व हरीचंद्र दियेवर दोन्ही रा.गाडेगाव अशी आरोपीचे नाव आहे.*
*मिळालेल्या माहितीनुसार सावनेर उपविभागीय अधिकारी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गाडेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार चेतन भोजराज दयेवर याने शेजारी रहात असल्याने हरीचंद्र दियेवार यांच्या घरी जीवनावश्यक वस्तूचा मर्यादेपेक्षा जास्त धान्यसाठा करून काळा बाजार करीत असल्याचा माहिती वरून आज सावनेर उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे व अन्न पूरवठा अधिकारी वसुधा राघटाटे यांनी दियेवर यांच्या घराची झडती घेतली असता हरीचंद्र दियेवार यांच्या घरी ५०किलो तांदूळ च्या ९० बॅग आढळून आल्या पूरवठा अधिकारी राघटाटे यांनी राशन दुकान चालक चेतन भोजराज दियेवार व हरीचंद्र दियेवार यांच्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदया अंतर्गत मर्यादेपेक्षा अतिरिक्त धान्यसाठा केल्याने आरोपींना धान्यासह खापा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले खापा पोलिसांनी दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली आहे या घटनेमुळे सरकारी स्वस्त धान्य दुकानादारात हडकंप मचला आहे*
*एकिकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे नागरिकांना अक्षरशः घरातच कोंबून राहवे लागत आहे.गोर गरीब मजूरा सह मध्यम वर्गीय नागरिकांच्या मागील एक महिन्या पासून हाताला काम नाही.व सदर लाँकडाऊन केव्हा उघडणार,उघडणार की नाही याची शक्यता सद्यस्थितीत दिसत नाही अश्यात घरी असलेली जमा पुंजी व शासनाव्दारे मीळणारे अन्न यावर अवलंबून असलेल्या वर्गाकरिता शासनाने अन्न धान्याची व्यवस्था करुण त्याचे मोफत वितरण करण्याची जबाबदारी या शासकीय स्वस्त धान्य विक्रेत्यांना देण्यात आली आहे यात काही दुकानदार तय मनकापेक्षा कमी धान्य देऊन उरलेले धान्याचा चढ्या भावात काळाबाजार करण्याच्या बेतात असल्याचे वुत्त नेमिचीच बाब आहे यावर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व अन्न पुरवठा अधिकारी यांनी वरच्यावर तालुकातील सर्व शासकीय धान्य विक्रेता यांच्या दुकानात भेट देउण दुकानात असलेल्या धान्याची व वितरीत केलेल्या धान्याचा अहवाल नियमितपणे तपासावा अशी मागणी नागरिकांतुन होत आहे*