*एसआरपीच्या पोलिस उपनिरीक्षकाची गोळी घालून आत्महत्या*
गडचिरोली प्रतिनिधी-सूरज कुकुडकर
गडचिरोली: धानोरा तालुक्यातील सावरगाव पोलिस मदत केंद्रात कर्तव्यावर असलेले पोलिस उपनिरीक्षक् चंद्रकांत शिंदे(४५) यांनी काल(ता.२२) रात्री आठ वाजताच्या सुमारास स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
चंद्रकांत शिंदे राज्य राखीव दलाच्या सोलापूर गट १० या तुकडीत कार्यरत होते. मागील दोन महिन्यांपासून ही तुकडी सावरगाव येथे कार्यरत आहे. मागील काही वर्षांपासून शिंदे यांना पाठीच्या कण्याचा आजार होता. अशातही त्यांना नक्षलविरोधी अभियानावर जावे लागत असे. त्यामुळे मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा कयास आहे. पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.
गडचिरोलीमध्ये राज्य दलाच्या जवानाने राहत्या घरात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
आजारपणाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं या जवाने आत्महत्येपूर्वी पत्रात स्पष्ट केलं आहे.
राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक 10 चे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शिदे यांनी मध्यराञी सावरगाव येथील पोलीस ठाण्याच्या क्वार्टरमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली. शिंदे यांच्या आत्महत्येमुळे राज्य राखीव दलात एकच खळबळ उडाली आहे.
शिंदे यांनी आपल्याकडे असलेल्या रायफलमधून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून जीवनयात्रा संपवली. शिंदे यांच्या मृतदेहाजवळ एक पत्र मिळाले त्यात आजारपणामुळे कंटाळून आत्महत्या केल्याचे पत्रात लिहिले आहे.
चंद्रकांत शिंदे यांनी हे पत्र आपल्या पत्नीला उद्देशून लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अत्यंत भावनिक संदेश लिहिला आहे. आपली पत्नी मधू शिंदे यांची माफी मागत आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. चंद्रकांत शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात आपण गेल्या काही वर्षांपासून आजाराला कंटाळलो आहे. झोप काय असते हे मला माहितीच नाही. त्यातच कमरेचा त्रास होत आहे, त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलं.
चंद्रकांत शिंदे यांच्या आत्महत्येमुळे राज्य राखील पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.