*माठावर “कोरोना” अवाढव्य दरवाढ*
*70-80 ला मीळणारे माठ 150 पार*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत दिनेश चौरसीया सावनेर*
सावनेर- हिन्दू सणात महत्वाचा सण म्हणजे अक्षय् तृतीयेची पूजा आणी अक्षय तु्तीया पुजणास लागणारे केळी व करा म्हणजेच (माठ ) या कोरोना च्या संकटात चक्क शंभरहून कीतीतरी महाग झाला आहे*
*खरे तर आपल्या संस्कृतीत या माठाचा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या नावाने संबोधून त्याचा वापर केला जातो आज महाराष्ट्र न्यूज मीडियाच्या माध्यमातून विविध प्रसंगात वापरण्यात येणार्या माठांची नावे आपल्या वाचक व दर्शनासाठी उपलब्ध करुण देत आहोत*
*अक्षय तु्तीयेला होणार्या पुजनात स्वर्गीय माता म्हणून लाल रंगाचे त्याला केळी व स्वर्गीय पिता म्हणून काळ्या रंगाचे त्याला करा म्हणतात.तर मराठीत मातीच्या भांड्याला उपयुक्तते नुसार व प्रसंगानुसार वेगवेगळ्या नांवांनी संबोधले जाते*
*पिण्याच्या पाण्याचा …माठ*
*अंत्यसंस्काराला…मडकं*
*नवरात्रात …घट*
*वाजविण्यासाठी…घटम्*
*संक्रांतीला…सुगडं*
*दहिहंडीला…हंडी*
*दही लावायला…गाडगं*
*लक्ष्मीपूजनाचे…बोळकं*
*लग्न विधीत…अविघ्न कलश*
*आणि अक्षय्य तृतीयेला…केळी व करा*
*खरच आपली मराठी भाषा कीती समृद्ध व श्रीमंत आहे याचे हे छोटेशे उदाहरण*
*परंतू कोरोना विषाणूंचा वाढत्या प्रादुर्भावात या माठांच्या किमतीत अवाढव्य वाढ झाल्याचे निदर्शनास येत असुन छोटेशे माठ चक्क शंभर रुपये तर इतर मोठ्या माठांची कींम्मती गगनाला भीडल्या आहेत*