*विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनने जमा केली निधी मुख्यमंत्री सहाय्यता फंडात निधी जमा*

*विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनने जमा केली निधी मुख्यमंत्री सहाय्यता फंडात निधी जमा*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

नागपुर:- राज्यात व देशात कोरोना संकटामुळे लॉकडाऊन लागल्यानंतर कराचे रूपाने येणारे उत्पन्न थांबले.. आर्थिक चक्र थांबल्याने याचे दूरुगामी परिणाम देशाला व राज्याला सोसावे लागणार आहेत. आर्थिक चक्र थांबल्याने अनेक उद्योजकांनी , सिनेकलावंतांनी, सामाजिक संस्थांनी , संघटनांनी मदत देण्यास सुरुवात केली. जमा खर्च असेल तर बॅलन्स राहतो परन्तु फक्त खर्च असेल आर्थिक घडी विस्कटणारच.
वास्तवतेची जाणीव विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनला होतीच. याच कारणास्तव चंद्रपूर महाऔष्णिक, मारेगाव, सोलापूर, कोकण, धुळे आदी भागातील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धान्याची किट वाटप केली, अनेकांनी मास्क सॅनिटायझर वाटप केली. पारस औष्णिक विज केंद्रात , नाशिक येथे रक्तदान केले गेले.
संघटनेच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून निधी संकलनाचा निर्णय घेतला. त्यानुसार दिनांक 7 एप्रिल रोजी सरचिटणीस आर. टी. देवकांत यांनी आवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. संघटनेचे तिन्ही वीज कंपनीत फक्त पदाधिकारी 2000 चे वर आहेत त्यामुळे किमान पदाधिकारी यांचे कडून निधी यावा अशी अपेक्षा केंद्रीय पदाधिकारी यांनी बाळगली होती. अपेक्षेप्रमाणे दिनांक 7 एप्रिल ते 24 एप्रिल अखेर 90% कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खिशातून स्वतंत्र असा निधी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या खात्यावर जमा केला. 11 लाख 35 हजार एवढा निधी आतापर्यत जमा झाला आहे. नागपूर, काटोल, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, वाशीम, येवला,नाशिक,धुळे या पतसंस्थानी यामध्ये 1,05,332/- चे योगदान दिले आहे. काही निवृत्त पदाधिकाऱ्यांनी योगदान दिले आहे काही पतसंस्था कर्मचाऱ्यांनी देखील निधी दिला आहे ,इतर 10 लाखाचे वरचा निधी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जमा केला आहे. संघटना 30 एप्रिल पर्यंत निधी संकलनाचे कार्य सुरू ठेवणार आहे. 1 दिवसाचे वेतना व्यतिरिक्त हे कार्यकर्त्यांचे स्वेच्छेने सुरू असलेले योगदान आहे. किमान 501/- निधी देण्याचे आवाहन संघटनेने केले असल्याने अजूनही निधी संकलन वाढणार आहे. सरचिटणीस आर. टी. देवकांत रोजची अपडेट सर्वाना कळवितात. निधी संकलनासाठी केंद्रीय अध्यक्ष रवी बारई नागपूर, उपाध्यक्ष गजानन सुपे कोराडी, प्रविण पाटील नाशिक, उपसरचिटणीस नितीन पवार कोपरगाव, उत्तम रोकडे चंद्रपूर, बाळासाहेब गायकवाड बारामती, राज्यसचिव हरिराम गीते परळी वैजनाथ, कोषाध्यक्ष संतोष घाडगे संपादक तांत्रिक शक्ति राम चव्हाण व विविध जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांची उत्तम अशी साथ मिळत आहे. एप्रिल अखेर एक चांगला निधी जमा होईल अशी खात्री कार्यकर्त्यांना आहे. पुरपस्थितीत संघटनेने 4 लाख 51 हजार एवढा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला होता. सामाजिक बांधिलकीत संघटना नेहमीच पुढे असते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …