*दुधाच्या कॅनमधे मोहफुल दारू*
*संशयास्पद स्थितीने अघडकीस आला हा प्रकार…*
*ग्रामीण भागात अश्या अवैध परिवहनाची बल्ले बल्ले*
*विशेष प्रतिनिधी कळमेश्वर*
*कळमेश्वर ःकोरोना वायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक व्यवसाय बंद असुन जिवनावश्यक वस्तूंचा व्यवसाय सुरू आहे अश्यात अनेकांनी शक्कल लढवित कुणी भाजीपाला, फळे,दुध दुपते आदींचा व्यवसाय करुण दोन पैसे कमावन्याच्या नादी लागला आहे यामुळे सदर व्यवसाय करणाऱ्यांच्या संखेत लाक्षणिक वाढ झाली व होत आहे दररोज नवीन भाजीपाला, दुघ दही ताक विकणारे दिसू लागले आहेत*
*अश्याच गोष्टींचा व सदर व्यवसाय राजरोस पणे सुरू असुन यात पोलीस दादांचा ही खतरा नाही नेमके हे च हेरुण आता भाजीपाल्याच्या गाडीत भाजीपाल्याच्या खाली गौमास,दारू लपवून परिवहन होत असल्याच्या घटना तर आता दुघ दुपत्याच्या कँनमधून अवैधरित्या मोहफुल दारुचे परिवहन होत असल्याची घटना कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आली*
*ग्रामस्थांच्या मदतीने पोलिस हवालदार महेश बिसेन यांनी त्याला रंगेहात ताब्यात घेतले. दुधाच्या कॅनची तपासणी केली असता त्यात सहा हजार सहाशे रुपयांची मोहफुलाची दारू आढळली. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून मोटारसायकलसह 52 हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.कोरोना विषाणुमुळे देशात लॉकडाउन सुरू आहे. नागरिकांना घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तूंचे दुकान सुरू असल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. यामुळे नागरिक कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर पडत आहेत. याची पोलिसांनाही चांगलीच कल्पना आहे. मात्र, दारुड्यांचे चांगलेच हाल होत आहे. अशात तळीरामांची सोय करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.*
*लॉकडाउनमुळे नानाविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. याचा सर्वाधिक त्रास हा दारुड्यांना होत असल्याचा दिसून येतो. दारू मिळत नसल्याने रोज दारू पिणाऱ्यांचे चांगलेच हाल होत आहेत. यामुळे तळीरामांनी तहानलेल्या मनाला शांत करण्यासाठी मोहाच्या दारूकडे आपला मोर्चा वळलेला आहे. कवडीमोल भावामध्ये विकली जाणारी मोहाची दारू आता देशी दारू पेक्षा जास्त किमतीत विकली जात आहे. हे सर्व लॉकडाउनमुळे शक्य झाले आहे.*
*लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी दारूडे मोहाच्या दारूकडे पाहतही नव्हते. देशी व विदेशीतच ते खुश राहायचे. मात्र, देशात कोरोनाचा शिरकाव झाला आणि सर्वकाही बंद झाले. दारूच मिळत नसल्याने दारुड्यांना त्रास हाऊन लागला. अनेकजण सॅनिटायझरवर आपली दारूची तहान भागवत आहेत. तर अनेकांनी मोहाच्या दारूकडे धाव घेतली आहे. अचानक मागणी वाढल्याने मोहाच्या दारूची तस्करी सुरू झाली आहे. अशीच तस्करी करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली.*
*पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंडखैरी परिसरात मोठ्या प्रमाणात मोहफूल दारूच्या हातभट्टी सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून दुधाच्या कॅनमध्ये मोहफुलाच्या दारूची सावली-मावलीमार्गे नागपूर शहरात वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली होती. ग्रामस्थांनी ही माहिती कळमेश्वर पोलिसांना दिली. पोलिस व ग्रामस्थांनी मिळून योजना आखली आणि पाळत ठेवली.*
*शुक्रवारी सकाळी जुबेर जब्बार खान (वय 27, रा. वॉर्ड क्रमांक 10, कळमेश्वर) हा दारूची तस्करी करीत असताना आढळला. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिस हवालदार महेश बिसेन यांनी त्याला रंगेहात ताब्यात घेतले. दुधाच्या कॅनची तपासणी केली असता त्यात सहा हजार सहाशे रुपयांची मोहफुलाची दारू आढळली. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून मोटारसायकलसह 52 हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.*
*दारू साठी दुधाच्या कॅनचा वापर*
*लॉकडाउनमुळे सर्वकाही बंद आहे. जीवनावश्यक वस्तू सोडल्यातर अन्य सामानांच्या विक्रीवर बंदी आहे. जीवनावश्यकमध्ये दुधाचाही समावेश आहे. मात्र, याचाच गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे. मोहफुलाची दारू विकण्यासाठी दुधाचा वापर करणाऱ्यारा पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गोंडखैरी येथे शुक्रवारी करण्यात आली.*
*लॉकडाउनमुळे दारूचे दुकान बंद असल्याचे मोहफुलाच्या दारूला चांगलीच मागणी आहे. दारूडे एक घुट दारूसाठी वाट्टेल ती किंमत मोजायला तयार आहे. त्यामुळे याची तस्करी वाढली आहे. दारूच्या अवैध परिवहनाकरिता दुधाच्या कॅनचा वापर होत असल्याने पोलिसांची चिंता आणखीनच वाढली आहे. विश्वास करावा तर कुणावर, असाच प्रश्न त्यांचा मनात उपस्थित होत आहे*
*शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात ही ठिकठिकाणी बँरेकेटिग करण्यात आली असून त्या ठाणावरुण किराणा भाजीपाला, दुध दुपते व इतर कारणे सांगुन निघणारे दुचाकी तीन चाकी व चारचाकी वाहणांची कसुन चौकशी व्हावी व त्यांनतरच त्यांना शहरात प्रवेश देण्यात यावा अशि मागणी महाराष्ट्र न्यूज मीडिया च्या वतीने नागरिकांतून होत आहे*