*जिवापाड जपलेल्या बैलानेच घेतला मालकाचा जीव.. शेतकरी ठार*
*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
नागपुर:- बैलाला बांधण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बैलाने अचानक हल्ला केला. बैलाचे शिंग पोटात घुसल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादाक घटना सावनेर तालुक्यातील चांपा गावात उघडकीस आली.
पाटणसावंगी जवळच असलेल्या चांपा गावाच्या शिवारात शेतामध्ये शेतीचे काम झाल्यानंतर बैलांना बांधण्यासाठी जात असताना दि. 24 एप्रिल ला सायंकाळी 5 वाजता अचानक एका बैलाने सुरेश तुळशीराम भड यांच्यावर हल्ला केला. प्रतिकार करूनही बैलाने टोकदार शिंग पोटात घुसवले व पायाने छाती वर मारले. त्यात तो गंभीर जखमी झाला.स्थानिक शिवारातील लोकांना माहिती होताच त्याला 7 स्टार,नागपूर हॉस्पिटलमध्ये नेले परंतु अतिरक्तात्रावासामुळे उपचारा दरम्यान रात्री 2 वाजता त्याचा मृत्यू झाला, यामुळे भड कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बैलाने शेतकरी मारल्याची माहिती या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहेत.
त्यापच्यात त्यांच्या मागे पत्नी व दोन मुली आहे.