*साहेब विद्यूत बिल भरायचं कुठून*
*दुष्काळात तेरावा महिना*
*महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी(महावितरण) चा प्रताप*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत प्रतिनिधी दिनेश चौरसीया*
*सावनेर –ऐकीकडे कोरोना वायरस चा प्रादुर्भावावर मात करण्यासाठी शासकीय यंत्रणा जिवाचे रानं करीत आहेत.व शासनाच्या दिशानिर्देशाचे संपूर्ण देशवासीयांसह समस्त दुकानदार बंधू पालन करुण या संकटकाळात शासनाच्या सोबत खंबीरपणे पणे उभे आहेत*
*ऐकीकडे गोरगरिब बांधवांना जिवनावश्यक वस्तू पुरविण्याकरिता शासन व सामाजिक कार्यकर्ते सोबतच व्यापारी बंधू आपले दुकाने बंद ठेवून पुढाकार घेत आहे तर काहि छोट्या व्यापार्यांची तर स्वतः ची खान्यापिण्याची सोय नाही अश्यात महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीच्या महावितरण व्दारे आँनलाईन विद्यूत देयक पाठवून धडकींच बसविण्याचे कार्य करत आहे*
*दुकानदार बांधवांनी आपल्या व्यथा मांडाव्यात तरी कुठे*
*अहो साहेब आपण जरा विचारपूर्वक विचार करा मागील दिड महिन्यापासुन ज्या दुकानदारांनी आपल्या दुकानाचे कुलुप उघडले नाही,तो दोन वेळ आपल्या परिवारा सोबत पोटभर जेवतो की नाही,मागील दिड महिन्यात त्याने दुकानाचा किराया कुठून भरला असेल,दुकानातील नौकरांचा पगार कुठून केला असेल,त्याच्यावर असलेले कर्जाचे हप्ते कोठून भरले असतील,त्यावर असलेली उधारवाडी कोठून चुकवली असेल,आपल्या परिवाराचा प्रपंच कसा रेटत असेल अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधूनही मीळणार नाही.मग मागील दिड महिण्यापासून दुकानदार्या बंद आहे तर आपण विध्यूत मीटरचे वाचन कसे केले.हेच कळेनासे होत आहे.*
*केन्द्र व राज्य शासनाने समस्त जनतेस लाँकडाऊन पुर्वीच आश्वस्त केले होते की या कठीण प्रसंगी साथ द्या शासन आपल्या सोबत राहील.व समस्त नागरिकांन सोबतच व्यापारी बंधूंना त्याच्यावर असलेले कर्ज,बँक व इतर देयकाबद्दल योग्य सवलती देण्याचे आश्वासन दिले होते.मग मधातच हे विद्यूत देयक कसे*
*मागील दिड महिन्यापासून सुरू असलेले लाँकडाऊन पुढे कीती सुरु राहणार हे अद्यापही निश्चित नाही व लाँकडाऊन संपल्यानंतर ही दोन चार महिने तर समस्त नागरिकांना व दुकानदारांना त्यांची स्थीती सुधारणा होण्यासाठी लागतील आज कसाबसा तै आपले व आपल्या परिवाराच्या पोटाची खडगी भरण्याचा प्रयत्न करीत आहे अश्यात आपण विद्यूत देयक त्यांच्या हाती देऊण त्यांचे टेन्शन अधिक वाढवू नका*
*जी दुकाने पुर्णता बंद आहेत त्यांचे विद्यूत देयक माफ करा*
*लाँकडाऊन मुळे जी दुकाने पुर्णतख बंद आहेत अश्या समस्त दुकानदारांना लाँकडाऊन सुरु झाल्यापासून ते व्यवसाय सुरळीतपणे सुरु होई पर्यंतचे विध्यूत बील माफ करण्यात यावे अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे*