*केळवद पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान पकडली 50 लिटर मोहाफुलाची दारू* *लाँकडाऊन दरम्यान मोहफुल दारू ला जबर मागणी*

*केळवद पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान पकडली 50 लिटर मोहाफुलाची दारू*

 

*लाँकडाऊन दरम्यान मोहफुल दारू ला जबर मागणी*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*

*केळवदपोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार मध्यप्रदेशातून टू व्हीलर हिरो होंडा पॅशन प्लस वर दोन युवक मोहाफुलाची दारू घेऊन पहाटे ५ :०० वाजताच्या सुमारास सावळी ते केळवद मार्गे पांढऱ्या रंगाच्या पोत्यात मोहाफुलाची दारू घेऊन येत आहे ताबडतोब केळवद पोलिसांनी दक्षता घेत रामपुरी फाटा येथे नाकेबंदी सुरू केली या दरम्यान दोन युवक पांढऱ्या रंगाचे पोते गाडीवर घेवुन येत असता पोलिसांना दिसले वाहन क्रमांक एम.एच. ४० डी.६६४२ होरोहोंडा पॅशन प्लस नाकाबंदी करतेवेळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी युवकास थांबविले त्याची चौकशी सुरू केली असता पांढऱ्या रंगाचे पोते उघडायला सांगितले यावेळी त्या पांढऱ्या पोत्यात रबर ट्यूब मध्ये पन्नास लिटर या फुलाची दारू असल्याचे निदर्शनास आले यावरून युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले चौकशी केली*
*अवैध रित्या दारूचे परिवहन करणारे दोन्ही आरोपी अजय जगदीश सहानी , वय १८ , गजानन देवराव टापरे ,वय ३२ दोन्ही राहणार वेकोली चणकापूर वसाहत येथील रहिवासी असून मध्यप्रदेशमध्ये मोह फुलाची दारू आणायला गेले होते आरोपी जवळून पन्नास लिटर मोहफुलाची दारू किंमत दहा हजार रुपये, गाडी किंमत वीस हजार रुपये मुद्देमाल जप्त करून मोहाफुलच्या दारूचे नमुने घेवुन दारूचा नाश केला व आरोपी विरुद्ध मोहाफुल दारू बाळगून दारूची वाहतूक वापरत असल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सदर कार्यवाही ठाणेदार सुरेश मटटामी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.*
*मागील दिड महिन्यापासून लाँकडाऊन व दारू ची दुकाने बंद असल्याने गावठी मोहफुल दारुला सुगीचे दिवस आले असल्याने व लाँकडाऊन मधे चढ्या किंमतीत खप होत असल्याने सदर व्यवसायात गडगंज माया गोळा करण्याकरिता अनेक युवा मंडळी व्यस्त असून केळवद पोलीसांनी सदर आरोपींना अटक करूण गुन्ह्याची नोंद केली आहे*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …