संग्रामपूर तालुक्यात तोतया बनावट पत्रकाराचा धुमाकुळ

संग्रामपूर तालुक्यात तोतया बनावट पत्रकाराचा धुमाकुळ

संग्रामपूरतालुक्याच ठिकाण असलेल्या संग्रामपूर शहरात एक युवक स्वतःला पत्रकार समजून इतरांसह पोलीसांनाही उल्लू बनवून अवैध धंदे करीत असल्याची बाब समोर येत आहे.
स्थानिक संग्रामपूरशहरात मोजकेच ईले.मिडीया व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी ,पत्रकार असून ते बातम्या देवून जनतेपर्यत पोहचविण्याच काम करीत आहेत.परंतु पत्रकाराचे नावाला कलंक लावणारे काही युवक कोणत्याही वृत्तपत्रांचे,ईले.मिडीयाचे पत्रकार नसतांना खुलेआम पत्रकार म्हणून वावरत आहेत तालुक्यात व बाहेरच्या जिल्ह्यात सुद्धा जावून पत्रकार असल्याचे सांगत आहे.त्याचे सोबत एक थातूर मातुर पत्रकार म्हणून सहकारीही खुलेआम वावरत असुन अवैध धंदे करीत आहे.या तोतया बनावट पत्रकाराने मागील आठवड्यात एका होमगार्ड व पोलीसाशी एकेरी भाषेत बोलुन संचारबंदी व लाॕकडाऊनचे काळात हुज्जतबाजी केल्याने भर रस्त्यावर पोलीसांनी चांगलेच बदडले.व मोटर सायकल जप्त करण्याची कार्यवाही करणार होते.त्याने पत्रकार असल्याचे पोलीसांना सांगताच पोलीसांनीही काही पत्रकारांना कळवून काही पत्रकार घटनास्थळी पोहचले असता एका पत्रकाराने सांगितले की,साहेब हा पत्रकार नाही.व कार्यवाही न करता सोडून दिले.तरीही त्याची सवय गेली नाही.४ते५दिवसापुर्वी तालुक्याच्या बाहेर दुसऱ्या जिल्ह्यात सुद्धा एका लहान धंदेवाईकास पत्रकार असल्याचे सांगून अवैध धंदे करीत आहे.यावर वचक बसणे आवश्यक आहे.अधिकारी ,कर्मचारी,लहान मोठे दुकानदार व नागरिकांनी अश्या कोणत्याही इसमाने ,युवकाने पत्रकार असल्याचे सांगितलं तर कोणत्या ईले.मिडीया,वृत्तपत्रांचा पत्रकार आहे याची विचारणा करुन त्याचे कडील ओळखपत्र पहावे.त्यामुळे अश्या तोतया बनावट पत्रकार बनणा-यावर व पत्रकार म्हणून अवैध धंदे करणाऱ्या वर वचक बसेल.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …