भेंडवळ मांडणी अशी वर्तविली गेली भाकिते
*पृथ्वीवरचं संकट कायमच*
*अर्थव्यवस्थाही कोलमडलेली राहील*
*माणसांसह पिकांवरही रोगराईचे भाकीत*
*भेंडवळ मांडणीची परंपरा राहिली अखंड*
प्रल्हाद महाराज वाघ व सारंगधर महाराज यांनी वर्तविले भाकीत
बुलढाणा प्रतिनिधी – नंदकिशोर शिरसोले
भेंडवळ (जळगाव जामोद)- अक्षय तृतीयेला केल्या जाणारी 368 वर्षापासूनची परंपरा भेंडव मध्ये लॉकडाऊनच्या काळातही वाघ कुटुंबीयांच्या अवघ्या दोन जणांनी कायम ठेवली. याठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून ही मांडणी पुढे ढकलल्याचे त्यांनी जरी जाहीर केले होतेतरी, अनेक शेतकऱ्यांच्या आग्रहावरून अखेर काल रविवार 26 एप्रिल रोजी सायंकाळी वाघ कुटुंबियातील दोघांनी त्यांच्या शेतात जाऊन परंपरेप्रमाणे मांडणी केली. या मांडणीचे भाकीत आज सोमवार 27 एप्रिल रोजी सूर्योदयापूर्वी या दोघांनी केले.विशेष म्हणजे त्यावेळी तेथे कुठलीही गर्दी नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी सकाळी जाऊन बघितले त्यावेळी घटावरील *पुरी पूर्णपणे गायब असल्याने पृथ्वीवरील संकट कायमच राहणार असल्याचे भाकित वर्तवण्यात आले* तर करंजी म्हणजेच *कानोला हा सुद्धा गायब दिसल्याने अर्थव्यवस्था कोलमडली राहणार असल्याचा अंदाज बांधण्यात आला* तर *भादली नावाचे धान्य विखुरलेले दिसल्याने माणसावर व पिकांवरही या वर्षात रोगराई र कायम राहणार असल्याचे भाकित त्यांनी वर्तवले. यासह पाऊस सर्वसाधारण व चांगला जरी असलातरी अवकाळी पावसाचे भाकीत यात वर्तविण्यात आले आहे. तर पिकांची थोडीफार नासाडीचा अंदाजही बांधण्यात आला आहे.