*भारतीय संस्कारात संकट थोपवण्याची क्षमता*- प्रमोद कडू *स्वेच्छा रक्तदानाचा २६ वा दिवस* *आम सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवारचा उपक्रम*

*भारतीय संस्कारात संकट थोपवण्याची क्षमता*- प्रमोद कडू

*स्वेच्छा रक्तदानाचा २६ वा दिवस*

*आम सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवारचा उपक्रम*

*महापौर मौत्रिणी व भा. ज. यु. मो .ने केले रक्तदान*

विशेष प्रतिनिधि-गौतम धोटे

कोरपना :– कोरोना महामारीपुढे जगातील सर्व देशांनी हात टेकले,परंतु भारताने हे संकट थोपवून धरले आहे.या यशाचे मूळ भारतीय संस्कारात आहे.घरातील जेष्ठ व जवाबदार व्यक्तीचे निर्देश पालन करणे ही परंपरा आहे. कोरोना संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनांचे पालन जनता करीत आहे,म्हणून आपण हे संकट थोपवू शकत आहो.भारतातील स्थितीचा आता इतर देश अभ्यास करीत आहेत.भारतीय संस्कारातच संकट थोपविण्याची क्षमता आहे,असे प्रतिपादन प्रदेश भाजपा कार्यकारी सदस्य प्रमोद कडू यांनी केले.ते आम सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवार तर्फे आय एम ए सभागृहात आयोजित स्वेच्छा रक्तदान कार्यक्रमात २६ व्या दिवशी (२७ एप्रिल) सोमवारला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोल होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महापौर राखी कंचरलावार,उपमहापौर राहुल पावडे,नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार,छबुताई वैरागडे,मित्र परिवारचे दत्तप्रसंन्न महादानी,प्रकाश धारणे,डॉ तातावार,डॉ मंगेश गुलवाडे,डॉ झेबा निसार यांची उपस्थिती होती.
प्रमोद कडू म्हणाले,इतर देशांच्या तुलनेत हा देश फार मोठा आहे.येथे २७ राष्ट्रीय पक्ष आहेत तर काही प्रांतीय पक्ष आहेत.परंतु देशावर संकट आल्यावर सर्वांनी पंतप्रधानांच्या सुचनेचे पालन केले,अशी स्थिती दुसऱ्या कोणत्याही देशात नाही.लॉक डाउन चे पालन तंतोतंत होत असल्याने देश अजूनही सुरक्षित आहे.योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याचा हातखंडा आम सुधीर मुनगंटीवार यांचा असल्याने सरकार ला अनेक निर्णय घ्यावे लागले ,नव्हेतर त्यानी जिल्यात कोरोना पसरू नये म्हणून वेळेतच सूक्ष्म नियोजन करून गरजू व गरिबांना मदतीचा हात दिला.रक्तदान त्या सूक्ष्म नियोजनाचाच एक भाग आहे.असे ते म्हणाले.
यावेळी भारतमातेचे पूजन व दीप प्रज्वलन करून रक्तदानाला सुरवात करण्यात आली.महापौर कंचरलावार यांच्या मैत्रिणीनी व भा.ज.यु.मो च्या कार्यकर्त्यानी यात सहभाग घेतला.शोभा रेड्डी,सुजाता भास्करवार, सोनाली गुंडे,वर्षा सांबरे यांच्यासह विष्णू रेड्डी,कुणाल गुंडावार,अक्षय खांडेकर,पावन धोटे,शुभम सुलभेवार,स्वप्नील रोकमवार,अक्षय पारधी,अनिल उईके यांनी रक्तदान केले.
यावेळी महापौर कंचरलावार ,डॉ तातावार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.दत्तप्रसंन्न महादानी यांनी प्रास्ताविक,प्रशांत विघ्नेश्वर यांनी संचालन केले,तर सूरज पेदुलवार यांनी आभार मानले.कार्यक्रमाला हेमा भनोटिया,सारिका बोराडे,प्रज्वलन्त कडू,मयूर चहारे,रामकुमार आक्कापेलीवार यांची उपस्थिती होती.रक्त संकलन साठी वैद्यकीय महाविद्यालयच्या चमुने महत्वाची भूमिका बजावली. रक्तदात्याना मास्क वितरित करण्यात आले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …