*सावनेर शहरातील सामाजिक संस्था व नगरपरिषदेच्या वतीने तीन दिवसीय जनता कर्फ्यूचे जाहीर आवाहन:* *नागरिकांनी सहकार्य करावे (उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे)*

*सावनेर शहरातील सामाजिक संस्था व नगरपरिषदेच्या वतीने तीन दिवसीय जनता कर्फ्यूचे जाहीर आवाहन:*

*नागरिकांनी सहकार्य करावे (उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे)*


*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत दिनेश चौरसीया*
सावनेरकरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता तो रोखण्यासाठी शहरातील नागरीकांना जाहिर आवाहन करणेत येते की, शहरातील सर्व सामाजिक संस्था व नगर परिषदेच्या वतीने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता तीन दिवसीय जनता कर्फ्यू म्हणजेच गुरुवार दि.30 एप्रिल २०२० ते 2 मे तीन दिवसात हॉस्पिटल व मेडिकल वगळून संपूर्ण शहर बंद राहील*

*सावनेर शहरासह परिसरातील सर्व नागरीकांनी कळविण्यात येते की आवश्यक असल्यास मेडिकल व हॉस्पिटल वगळता इतर सर्व दुकाने सोबतच फळे व भाजीपाला विक्री देखील या जनता कर्फ्यू मधे तीन दिवस बंद राहतील.**

*तरी सावनेर शहरातील सर्व व्यावसायिकांनी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आपली दुकाने बंद ठेवावीत व हे तीन दिवस कोणत्याही नागरीकांनी घराबाहेर पडु नये असे आवाहन शहरातील सर्व सामाजिक संस्था तसेच सावनेर नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.*

*देशात वाढता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बघता तीन दिवसीय जनता कर्फ्यू*

*1)सावनेर शहरातील 30 एप्रिल 01 व 02 मे ला सर्वच व्यापारी प्रतिष्ठान बंद राहतील*

*2) सावनेर शहरा सोबतच संपूर्ण तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी दि.29 व 30 एप्रिल ला स्थानिक प्रशासनाव्दारे होणार आहे करीता कोणत्याही अफवावर लक्ष न देता प्रशासनास सहकार्य करावे*

*3) दि.30 एप्रिल 01 व 02 मे च्या जनता कर्फ्यूला शहरातील सर्व कीराना,औषधी,फळ विक्रेते,भाजीपाला,सह जिवनावश्यक वस्तू विक्रेत्यांनी सहकार्य करावे*

*4) आपले सावनेर शहर सद्यस्थितीत सुरक्षीत आहे व त्यास सुरक्षीत ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे करीती प्रशासनास सहकार्य करावे.तसेच परिसरात कोरोना विषाणू ग्रस्त रुग्ण आढळला,सतरंजीपुरा येथून काही संशयास्पद रुग्ण सावनेर शहरात हलवील्या जात आहेत.आश्या कोणत्याही अफवाना बळी पडू नका असे आव्हान याप्रसंगी करण्यात आले*

*तहसील कार्यालय सावनेर येथे पार पडलेल्या पत्रपरिषदेत उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,तहसीलदार दिपक कारंडे,मुख्याधिकारी रविन्द्र भेलावे,पोलीस निरीक्षक अशोक कोळी,प्राथमिक आरोग्य केन्द्राचे अधिकारी,नगरसेवक, सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य,व्यापारी संघ,नगरीतील सामाजिक संस्थेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …