मुलांना घरपोच आहार मिळतो काय.?-उज्जवला बोढारे
अधिकारी लोकप्रतिनिधीशी आढावा बैठक
विशेष प्रतिनिधि
मौदा-कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासन प्रशासन युद्ध स्तरावर प्रयन्त केले जात आहेत शासनाच्या योजना व उपक्रमांची माहिती देऊन अंगणवाडीतील मुलांना घरपोच आहार मिळत आहे काय याची खात्री करण्यासाठी जी प महिला बाल कल्याण सभापती उज्जवला बोढारे यांनी 29 मौदा पंचायत समितीमध्ये अधिकारी व पदाधिकारयाची बैठक घेतली यावेळी जीप सदस्य योगेश देशमुख, जी प सदस्य शालिनी देशमुख, जीप सदस्य कैलास बरबटे, जीप सदस्य राधा अग्रवाल, पंचायत समिती सभापती दुर्गा ठवकर, प स सदस्य स्वप्नील श्रावणकर, खडविकास अधिकारी दयाराम राठोड, अंगणवाडी सुपरवायझर, उपस्थित होते एरवी ३ ते,६ वर्षे वयोगटातील मुलांना अंगणवाडी मध्ये शिजवलेला आहार दिला जातो मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने हा आहार घरपोच देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार तालुक्यातील अंगणवाडीत प्रत्येक मुलांना ठरवलेल्या प्रमाणात घरपोच आहार मिळाला काय याबाबत सभापती उज्जवला बोढारे यांनी माहिती घेतली अंगणवाडीतील मुलासह स्तनदा माता, गर्भवती महिला ६ ते३ वर्षे वयोगटातील बालकांना घरपोच आहार वितरणाचे कार्य पूर्ण झाल्याची माहिती यावेळी दिली. हयगय केल्यास सुपरवायझर व सेविका जीमेदारी राहतील व त्यांचा वर कारवाई करण्यात येईल असी तकीत देण्यात आली.