नगर परिषद व नगर पंचायत कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यात यावे
आमदार सुभाष धोटे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
विशेष प्रतिनिधि-गौतम धोटे
कोरपना :–अख्या राज्यात कोरोना जिवघेण्या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. नगर परिषद, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी, सफाई कर्मचारी अग्निशमन कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी, तसेच नगर परिषदेचा प्रत्येक कर्मचारी कोरोन विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये व त्याला पायबंद घालण्यासाठी अहोरात्र शहरातील प्रत्येक भागात औषधाची फवारणी, नव्याने आलेल्या लोकांची माहिती संकलित करून त्यांना विलगीकरणाचे शिक्के मारणे, शहरात येणाऱ्या नागरीकांवर लक्ष ठेवण्यासाठी काम करणे, त्यांच्या नोंदी ठेवणे, शहरात गर्दी ची ठिकाणे होवु नये म्हणुन नागरीकांना जिवनावश्यक वस्तूचा पुरवठा करणे तसेच रैन बसेरा ची व्यवस्था करणे इत्यादी कामे प्रत्येक कर्मचारी स्वतः मुख्याधिकारी यांचे सह दैनदिन २४ तास करत आहे. अशा गंभीर परिस्थितीत त्यांना सुद्धा कोरोना व्हायरसचा फटका बसू शकतो. तसे झाल्यास त्यांना सरकारी संरक्षण आवश्यक आहे.
राज्यातील नगर परिषदा, नगर पंचायती मधील कर्मचारी हे कोरोना ग्रस्त परिस्थिती मध्ये सुरुवाती पासुनच स्वताचा जिव धोक्यात घालुन काम करीत आहे. या परिस्थिती शासनाच्या इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांना विम्याचे संरक्षण दिले आहे. परंतु नगर परिषद, नगर पंचायत कर्मचाऱ्यांना विम्याची सुविधा देणेबाबत मा. आयुक्त तथा संचालक स्तरावर उदासीनता दिसून येत आहे. यांची गांभीर्य पूर्वक विचार करून नगर परिषद कर्मचारी व अतिआवश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचारी यांना स्वास्थ/आरोग्य विमा व स्वास्थ कार्ड तसेच इतर शासकीय सुविधा त्वरीत उपलब्ध करून देण्यात याव्या अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे व आयुक्त तथा संचालक, नगर पालिका प्रशासन संचालनालय यांच्याकडे केली आहे.