कोरोणा सर्वेक्षण घाई.. आणि अधिकारी ऑफिसला पोहोचलेच नाही..*कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयातील वास्तव..

कोरोणा सर्वेक्षण घाई.. आणि अधिकारी ऑफिसला पोहोचलेच नाही..

*कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयातील वास्तव..

*विशेष प्रतिनिधी कळमेश्वर*

कळमेश्वर –देशांतर्गत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार यात झपाट्याने वाढ झाल्याने कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या covid-19 आजाराचे नियंत्रण आणि उपचारासाठी विविध उपाय योजना नागपूर जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. या अनुषंगाने घरोघरी कुटुंबनिहाय सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून प्रत्येक 50 घरामागे एक सर्वेक्षण नेमलेला आहे. यासंदर्भात प्रशासनाची एक मीटिंग घेण्यात आली या मिटींगमध्ये दिनांक 29. 4. 2020 रोजी घरोघरी जाऊन तपासणी करून कार्यक्षेत्रातील अति जोखमीच्या व्यक्तींची माहिती नोंद करून सुलभ संदर्भा करिता प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय येथे ठेवण्याच्या आवश्यक सूचना देण्यात आल्या .हाय रिक्स पापुलेशन मध्ये 60 वर्षावरील व्यक्ती ,बारा वर्षाखालील मुले, उच्च रक्तदाब, मधुमेह ,अस्थमा, शयरोग ,कर्करोग, हृदयविकार, गरोदर माता यांचा समावेश होतो एखाद्या क्षेत्रामध्ये कोरोनाव्हायरस चा प्रसार झाल्यास वर नमूद केलेल्या व्यक्तीवर विशेष लक्ष ठेवणे व त्यांच्या आरोग्याबाबत दैनंदिन पाठपुरावा करणे अत्यावश्यक ठरते या कारणास्तव तहसील प्रशासनाच्या वतीने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आणि शिक्षकांची नुकतीच एक बैठक आयोजित करून हाय रिक्स पोपुलेशन बाबत सर्वेक्षण करून माहिती जमा करण्यासाठी सांगण्यात आले. यात एका ग्रुप मध्ये 10 शिक्षक असून एका शिक्षकाला 50 घराचा सव्हे करायचा आहे.म्हणजे एक ग्रुप 500 घराचा सर्वे करतील.

एकूण 125 शिक्षक बोलाविले आहे याकरिता सर्व शिक्षकांना दिनांक 29 एप्रिल रोजी वेळेवर पोहोचणे गरजेचे असल्याचे कारण सांगून सकाळी ६.४५ वाजता ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे सर्व  शिक्षकांना बोलावन्यात आले मात्र ज्या अधिकाऱ्यांनी ही बैठक आयोजित केली होती आणि जे अधिकारी या सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांना सर्वेक्षणाबाबत मार्गदर्शन करणार होते ते सर्व अधिकारी दोन तास उलटूनही ८.४५ पर्यंत ग्रामीण रुग्णालय येथे हजरच झाले नव्हते. सर्वेक्षणाबाबत कुठलेही व्यवस्थित नियोजन करण्यात आले नाही, सर्वेक्षणाच्या नोंदी घेण्यासाठी प्रशासनाकडून शीट देण्यात येणार होती ती देण्यात आली नाही,किट देणार होते तेसुद्धा देण्यात आले नाही.  कोविड -१९ च्या अनुषंगाने दिनांक २९.०४.२०२० ला सकाळी ६.४५ वाजता कळमेश्वर शहरातील कार्यक्षेत्रात अतिजोखमीचे सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षकांना बोलाविले,इतक्या सकाळी नागपूर व इतर ठिकाणावरून येणाऱ्या शिक्षकांना प्रशासनाचे नियोजन नसल्यामुळे  सकाळी १० वा.पासून सर्वेक्षण कामाकरीता कामाला लागावे लागले. या ठिकाणी कोठलीही नास्त्याची व्यवस्था नव्हती.उपाशी पोटी काम व विशेषतः भर उन्हात जवळपास ३ वाजे पर्यंत काम करावे लागणार असल्याचा अंदाज असतानासुद्धा कोठलीही किट नाही, लिहण्याकरिता  शीट नाही,याला सर्वस्वी प्रशासनाचे सर्व अधिकारी जबाबदार आहे.शेवटी कोठलाही जबाबदार अधिकारी  सकाळी९.४५ पर्यंत न आल्यामुळे शिक्षकांनी स्वतःच एकमेकांना मदत करीत त्या पर्यवेक्ष काला  मदत केली.तोपर्यंत  ग्रामीण रुग्णालय, नगर परिषद आणि तहसील कार्यालयाचे अधिकारी उपस्थित नव्हते.आम्ही ही कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव कमी होण्याकरिता काम करण्यास तयार आहे.या राज्यातील लोकांचे आरोग्य सुरक्षित राहावे,हे आम्हालाही मनापासुन वाटते.परंतु या लॉक डाऊन च्या काळात कोठलेही शासकीय काम करतांना आदल्याच दिवशी त्याचे नियोजन व्हायला पाहिजे होते.याची खंत मनापासुन वाटते. अशी प्रतिक्रिया सर्वेक्षण आलेल्या आलेल्या शिक्षकांनी याप्रसंगी सदर प्रतिनिधीला दिली.

 अश्या धोकादायक वातावरणात खरोखरच योग्य सर्वेक्षण होणार काय असा प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होत असून सदर प्रतिनिधीने याठिकाणी येऊन माहिती घेतली असता खरे वास्तव उघड झाले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमरीश मोहब्बे, कोरूना बाबतचा चार्ज असणारे गव्हाणकर आणि नगरपालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी अर्चना टालाटुले सुद्धा यावेळी उशीरापर्यंत हजार झाल्या नव्हत्या. सर्वेक्षणासाठी आलेले  शिक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करून वरिष्ठ अधिकार्‍यांची वाट उशिरापर्यंत बघत होते मात्र कुंपणच शेत खातेय असा प्रकार आज ग्रामीण रुग्णालयात पाहायला मिळाला प्रशासन अजूनही कोरोना बाबत गंभीर नसल्याचे आज दिसून आले प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकारी अजूनही कळमेश्वर शहरात मुख्यालय राहण्यास तयार नाही दररोज अनेक पालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी नागपुर वरून ये-जा करीत असतात हे विशेष. 

यामध्ये पालिकेच्या अग्निशामक दलाच्या पर्यवेक्षक भाग्यश्री टोमसे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने कळमेश्वर आणि ब्राह्मणी शहरात केव्हा ही आग लागण्याचे प्रकार घडू शकतात तेव्हा अग्निशमन विभागाचा पर्यवेक्षक नागपुर वरून ये-जा करत असेल मुख्यालयी राहत नसेल तर कळमेश्वर ब्राह्मणी शहराचे भविष्य काय असा प्रश्न याठिकाणी नागरिकांकडून विचारला जात आहे. 

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …