ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन, कॅन्सरशी झुंज संपली.
ऋषी कपूर ला बॉलिवूडचे ‘चॉकलेट हिरो’ म्हणतात
ऋषी कपूर यांना सुमारे दोन वर्षांपूर्वी कॅन्सर झाल्याचं समोर आलं होतं. जवळपास वर्षभर न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेऊन ते भारतात परतले होते. परंतु त्यांची कॅन्सरसोबतची झुंज अपयशी ठरली.
बॉलिवूडचा ‘चॉकलेट हिरो’ अशी नावे मिरवणारे, कपूर खानदानाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे आणि सत्तर-ऐंशीचे दशक आपल्या मनमोहक भूमिकांनी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर काळाच्या पडद्याआड गेले आहेत. गुरुवारी सकाळी दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ऋषी कपूर यांचं निधन झाल्याची दु:खद बातमी दिली. कर्करोगावरील उपचारादरम्यान ऋषी कपूर यांची प्राणज्योत मालवली. तब्येत बिघडल्यामुळे मुंबईतील ‘सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन’ हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. वयाच्या 67 व्या वर्षी ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला
मुंबई : बॉलिवूड विश्वाला सलग दुसऱ्या दिवशी दुसरा धक्का बसला आहे. हरहुन्नरी कलाकार इरफान खान यांनी काल (20 एप्रिल) जगाला अलविदा केल्यानंतर आज (30 एप्रिल) बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ऋषी कपूर यांना एक आठवड्यापासून रुग्णालयात उपचार सुरु होते. ऋषी कपूर यांचे बंधू रणधीर कपूर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सलग दुसऱ्या दोन कलाकार गमावल्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
“कॅन्सरच्या आजारातील गुंतागुंतीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ते मागील एक आठवड्यापासून तिथेच आहेत. यावेळी उपचारादरम्यान त्यांना अनेक वेळा व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं,” अशी माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू सिंह या त्यांच्यासोबत रुग्णालयात होत्या.
ऋषी कपूर मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतील न्यूयॉर्कमधून कॅन्सरचा इलाज करुन मुंबईत परतले होते. या उपचारादरम्यान ऋषी कपूर अमेरिकेतील रुग्णालयात 11 महिने आणि 11 दिवस होते. तिथून परतल्यानंतर उपचार यापुढेही सुरु राहतील आणि ठणठणीत बरं होण्यासाठी काही काळ लागेल, असं त्यांनी सांगितलं होतं.
न्यूयॉर्कमध्ये उपचारादरम्यान ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूर आणि त्याची गर्लफ्रेण्ड आलिया भट यांच्यासह दीपिका पादूकोण, शाहरुख खान, आमीर खान, अनुपम खेर यांसारख्या अनेक कलाकारांनी ऋषी कपूर यांची भेट घेतली होती. स्वत: ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांनीही सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले होते.
न्यूयॉर्कहून परतल्यानंतर ऋषी कपूर ‘द बॉडी’ नावाच्या चित्रपटात काम केलं होतं. या सिनेमात त्यांच्यासोबत इम्रान हाश्मी आणि शोभिता धुलिपाला प्रमुख भूमिकेत होत्या. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर विशेष यश मिळालं नाही.
*महाराष्ट्र न्यूज मीडिया परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली तसेच या दुखःद प्रसंगातून कपूर परिवारस सावरण्याची इश्वर त्यांना शक्ती प्रदान करो*