*केळवद परिसरात मोहाफूल गावठी दारू भट्टीवर धाड*
*स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
*5,83,500/-रू. चा ऐवज जप्त*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेर – केळवद पो.स्टे.अंतर्गत अवैध मोहाफूल गावठी दारू भट्टीवर स्थानिक गुन्हे शाखेने कार्यवाही करून 04 आरोपींसह एकूण 5,83,500/- रू. चा मुद्देमाल जप्त दिनांक 29.4.2020 रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण चे पथक सावनरे उपविभागात पोलीस स्टेशन केळवद अंतर्गत कोवीड 19 संबंधाने पेट्रोलींग करीत असता खात्रीशिर बातमी द्वारे पोस्टे केळवद अंतर्गत छत्रापुर खदान शिवारात पारधी समाजाचे लोक उमरी तलावाच्या काठावर हातभट्टी मोहाफुलाची गावठी दारू काढत आहे या खबरेवरून धिड़ टाकली असता आरोपी क्र. 1) तारेसिंग पवार , 2) सौ. कुंदा अलगरे 3) सौ. सीताबाई सोलंकी, 4) सौ. राणी मारवाडी सर्व रा. छत्रापुर पारधी बेडा त्यांचे ताब्यातुन 4600 लिटर मोहाफुल सडवा रसायण, 540 लि. मोहाफुल दारू व हातभट्टी साहित्य असा एकुण 5,83,500/-रू. चा माल जप्त करण्यात आला.*
*चारही आरोपीं विरूध्द पोस्टे केळवद येथे कलम 65 (ई) (ब) (फ) महाराष्ट्र दारूबंदी कायदयान्वये कार्यवाही करून पुढील कार्यवाही करीता पोस्टे केळवद यांचे ताब्यात देण्यात आले.*
*सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांचे मार्गदर्शनात सहा. फौजदार बाबा केचे, पोलीस हवालदार चंद्रशेखर घडेकर, पोलीस शिपाई रोहण डाखोरे, महिला पोलीस शिपाई नम्रता बघेल यांनी पार पाडली.*
*कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लाँकडाऊन मधे सर्वत्र मधविक्री बंद असल्यामुळे या अवैध मोहफुल दारुची मागणी वाढली असुन सदर अवैध गावठी मोहफुल दारुचे परिवहन दुचाकी वाहन,दुधाचे व पाण्याचे कँन,भाजीपाला,कीराणा परिवहन करणार्या वाहनानं सोबतच “जिवन आवश्यक वस्तू” असे लिहून कागदे चिटकवून सर्यास पणे होत आहे.शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात ही असे अवैध परिवहन रोखण्यासाठी तालुका राजस्व अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या मान्यताप्राप्त वाहनांनाच परिवहनाची परवानगी देण्यात येऊण अश्या अवैध व्यवसायावर काही प्रमाणात आळा बसु शकतो असे जाणकारांचे मत आहज*