भाग -1
*मुख्याधिकारींचे अक्षम दुर्लक्ष*
*सावनेर च्या गल्ली बोळी व रस्त्यावर धावतात बिन क्रमांकाचे यमदुत*
*मुख्याधिकारी सह नगर प्रशासनाचे आक्षम्य दुर्लक्ष*
*अश्यात एखादी जिवीत हाणी झाल्यास जबाबदार कोण…?*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेर- नगर परिषद सावनेर येथील तत्कालीन मुख्याधिकारी संघमित्रा ढोके यांच्या प्रयत्नांने नगरितील घाण व कचराची उचल करण्याकरिता टाटा एस कंपनीच्या जवळपास सहा छोटे चारचाकी वाहन खरेदी करण्यात आले होते*
*सदर वहानातून शहरातील मुख्य रस्त्या व गल्ली बोळीतील घनकचरा उचल आजही केल्या जात आहे त्याकाळातच मुख्याधिकारी संघमित्रा ढोके व स्थानिक प्रशासनाचे सुत न जुडल्यामुळे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी यांचे तडकाफडकी स्थलांतर करण्यात आले व खरेदी केल्याल्या या वाहनांचे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात नोंदणी व परिवहन प्रमाणपत्रे (पासींग) इत्यादींचा विसर नव्याने येणारे मुख्याधिकारी व नगर प्रशासनास पडला व सदर वाहने आजही नगरीत राजरोसपणे धावत आहे ज्यावर कोणत्याही प्रकारची नंबर प्लेट नाही,परवाना नही व मीळत असलेल्या खात्री लायक माहिती नूसार सदर वाहन चालवीणार्यां काही चालकांजवळ ही वाहन चालविण्याचा परवाना सुध्दा नसल्याचे बोलले जात आहे.अश्यात एखादा अपघात झाल्यास जबाबदारी कुणाची असा यक्ष प्रश्न निर्माण तर होतोच परंतू अश्या जिवनावश्यक महत्वपुर्ण वस्तूचे परवाने नाही तर वाहनांचे विमा परवाने कोठून राहणार*
*याऊपर शहरातील घनकचरा उचल करण्यासाठी नेमलेल्या कांत्रटदार सदर वाहने वापरून आपल्या सुविधा नूसार अकुशल व चालचलावू वाहन ठेवून आपले कार्य करत आहेत यावर जनप्रतिनिधी तर सोडा प्रशासनिक अधिकारी मुख्याधिकारी यांचे लक्ष व नियंत्रण नाही तर या नगरीचे व येथील नागरिकांच्या जिवीतेवर या यमराज्यांचा फास आवरून केव्हा काही दुर्घटना घडून एखाद्याच्या जिवीतेचे बरे वाईट होईल सांगता येत नाही*
*सदर वाहनांच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी नगर परिषद परिसरात गेले असता वर उपस्थितीत प्रश्न खरे आढळून आले तर अशीही माहीती प्राप्त होत आहे की मागील अनेक वर्षांपासून नगर प्रशासणाच्या सेवेत असलेल्या वहानांचे नोंदनी व इतर परवाने संदर्भात कार्य करण्यात आले आहे परंतू आज तारखेपर्यंत सदर वाहनांच्या नंबर प्लेटा कोर्याच आहेत.याला जबाबदार प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी यांच्यावर येणारच.आपले कर्तव्य व जबाबदारी ला बगल देणार्या मुख्याधिकारी यांच्यांवर सदर विषयावर योग्य चौकशी कारूण कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरवासीयातुन होत आहे*