*अवैध मोहफुल दारु भट्टीवर गुन्हे शाखेची धाड़* *सहा लक्ष बहात्तर हजार एकशे रुपयांचा मुद्देमाल जप्त*

*अवैध मोहफुल दारु भट्टीवर गुन्हे शाखेची धाड़*

*सहा लक्ष बहात्तर हजार एकशे रुपयांचा मुद्देमाल जप्त*

*विशेष क्राईम न्यूज प्रतिनिधी नागपूर*


*नागपूर- दि.3 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण चे पथकाने पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत कोवीड़ 19 चे संबंधीत पेट्रोलिंग करत असतांना पोलीस मीत्राने दिलेल्या गुप्त माहिती नुसार सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा दुधबर्डी शिवारातील जगदीश सावजी याच्या शेतात महिपाल मारवाडी रा.तिडंगी पारधी बेडा याचे सह हातभट्टी लावून मोहफुल गावठी दारु गाळत असल्याची खबरे वरूण दुदबर्डी शिवारात छापामार कारवाई केली असता जगदीश सावजी रा.सावनेर व महिपाल मारवाडी हे हातभट्टीवर गावठी मोहफुल दारु गाळत असल्याचे आढळून आले.त्यांचे ताब्यातून 3800 लिटर मोहफुल सडवा रसायन व 280 लिटर मोहफुल गावठी दारू तसेच हातभट्टी व दारू गाळण्याचे साहित्य असे एकुण सहा लक्ष बहात्तर हजार एकशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन महिपाल मारवाडी हा घटनास्थळावरून पोलिसांना पाहून पळून गेला*


*वरिल दोन्ही आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन सावनेर येथे कलम 65 (ई),(ब) व (फ) महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करुण पुढील कारवाई करिता सावनेर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले*


*सदरची कारवाई नागपूर ग्रामीण चे पोलीस अधिक्षक राकेश ओला व अपर पोलीस अधिक्षक श्रीमती मोनिका राऊत,स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक अनिल जिटटावार यांचे मार्गदर्शनाखाली सहा.फौझदार बाबा केचे,प्रमोद गवरे,पोलीस हवालदार चंद्रशेखर घोडेकर,गजेंद्र चौधरी,महेश जाधव,पोनाशी रोहन डाखोरे,अमोल दुधे आदींनी भाग घेतला*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …