*सावनेर मध्ये दररोज रस्त्यावर भरते यात्रा* *होत आहे लाँकडाऊन ची ऐसी की तैसी* *लाँकडाऊन की अप-डाऊन* *तोंड पाहून कारवाई करत असलेल्याचा न.प.वर आरोप*

*सावनेर मध्ये दररोज रस्त्यावर भरते यात्रा*


*होत आहे लाँकडाऊन ची ऐसी की तैसी*

*लाँकडाऊन की अप-डाऊन*

*तोंड पाहून कारवाई करत असलेल्याचा न.प.वर आरोप*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*

*सावनेरः जसजसे लाँकडाऊन ची मर्यादा वाढत आहे तसतशी रस्त्यावर गर्दी वाढत आहे याला जबाबदार कोण स्थानिक नगर प्रशासन की पोलीस प्रशासन हे कळेनासे होत आहे*


*दररोज सकाळी 8-00 ते 12-00 च्या दरम्यान रस्ते दुचाकी चारची वाहनां सोबतच नागरिकांच्या गर्दीने फुलून निघतात.शहरात उसळणार्या गर्दी वर अंकुश ठेवण्ताचे कार्य विशेषतः मुख्याधिकारी सावनेर यांच्या मार्गदर्शनाखाली तर पोलीस विभाग सहकार्याच्या भुमिकेत अशी योजना आखन्यात आली असुन पोलीस प्रशासनाने नगरिच्या मुख्य रस्त्यावर बँरेकेटिग सोबतच चौका चौकात पोलीस बंदोबस्तासोबतच फीरते पथक देऊन नगर प्रशासनास सहकार्याच्या भुमिकेत आहे.तर मुख्याधिकारी साहेब तर नगरिच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात सोडून आपल्या कँबीन मधे असे उघड चित्र आहे*

*कुपन (टोकन) बनले शोभेची वस्तू*

*नगर प्रशासनाने नगरितील नागरिकांना गुलाबी, पीवळ्या,हिरव्या,निळ्या रंगाचे कुपन वाटप करुण त्यात प्रत्येक नागरिकांना दर चार दिवसांनंतर म्हणजेच आठवड्यात दोन दा बाजारात येण्याची परवानगी देण्यात आली हे नगर प्रशासनाचे एक चांगले पाऊल मानले गेले परंतू त्यावर अमलबजावणी “शुन्यच” व त्यामुळेच रस्त्यावर गर्दी उसळत असल्याचे जाणकारांचे मत आहे.जेव्हा अमलबजावणी करण्याची मुख्याधिकारी यांची तयारी नव्हती तर नगर प्रशासनाच्या तिजोरीवर या टोकन छपाई व वाटप करण्यासाठी झालेल्या अवाढव्य खर्चाचा भुर्देंड का…?असा सवाल ही जनसामान्यांतुन होत आहे*

*तोंड पाहून होत असलेल्या कारवाई मुळे नागरिकात रोष*

*मागील दोन तीन दिवसापासुन नगर प्रशासनाचे कर्मचारी काही कांत्रटी व रोजंदारीवर कार्यरत कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उभे तर आहेत परंतू ते टोकन तपासणी करत असल्याचे तर दिसतच नाही तर तोंडावर मास्क अथवा कपडा नसलेल्यांना ते ही “ओळखीच्यांना सोडा व बिन ओळखी व गोर गरिबांची फाडा” या तत्वावर तोंड पाहून कारवाई करत नगर प्रशासनाप्री नागरिकात रोष निर्माण करण्याचे कार्य प्रमुखतेनी करत आहेत.याकडे वरिष्ठ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी साहेब आदिंनी लक्ष देऊण गोर गरिबांवर होत असलेला अन्याय दुर करण्याकरिता पारदर्शक कारवाई करण्याचे आदेशीत करावे.मग तो मोठा असो की छोटा,गरिब असो की श्रीमंत,रसुखदार असो की सर्व सामान्य कुणासाठी कायदा व नियम वेगळे नाहीत या अनुशंगाने कारवाई करण्याच धाडस मुख्याधिकारी करतील का…?*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …