निराधार व निराश्रित करिता श्री राम युवा सेना जिल्हाध्यक्ष मयूर ज्ञानेश्वर दंढारे व त्याचा मित्र परिवार ठरतोय आधारवड

निराधार व निराश्रित करिता श्री राम युवा सेना जिल्हाध्यक्ष मयूर ज्ञानेश्वर दंढारे व त्याचा मित्र परिवार ठरतोय आधारवड

विशेष प्रतिनिधी- श्रीकांत मालधुरे
मोवाडलॉक डाउन मुळे उपासमारीची वेळ आलेल्या निराधार , निराश्रित , गरीब मजुराकरिता जलालखेडा येथील
श्री राम युवा सेना जिल्हाध्यक्ष मयूर ज्ञानेश्वर दंढारे व त्याचा मित्र परिवार रात्रंदिवस झटून गरजू पर्यंत मदत पोहचवित आहे.या संकट काळात तो व त्याचे मित्र निराधार, निराश्रित गरीबाकरिता आधारवड ठरत आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आणण्याकरिता लॉक डाउन सुरू आहे. सर्व कामे ठप्प झालीत .त्यामुळे हातावर पोट असनाऱ्या मजूर, नागरिकांचा उदरनिर्वाह चा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.शासनाने धान्य दिले परंतु तेल, तिखट, मिठाचे काय? समाजातील अनेक आपआपल्या परीने गरजूंना मदत करीत आहे. त्यातीलच एक नाव मयूर ज्ञानेश्वर दंढारे. वडील समता परिषद नागपूर चे माजी जिल्हाध्यक्ष स्व. ज्ञानेश्वर दंढारे यांच्याकडून जनसामान्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढणे ,गरजूंना मदत करण्याचा वारसा मिळालेला हा गरम रक्ताचा तरुण आज रात्रंदिवस गरजूंच्या मदतीकरिता धडपडत आहे.
लॉक डाउन सुरू होताच हातावर पोट असनार्यांची मोठी कुचंबणा झाली.शासनाने धान्य वाटप केले परंतु तेल , तिखट व मीठ चे काय हा प्रश्न निर्माण झाला.ही गोष्ट हेरून मयूर मधील समाजसेवक जागा झाला. प्रथम स्वतःजवळील रक्कम खर्च करून काही कुटुंबाना त्यानि जीवनावश्यक वस्तूंच्या किट चे वाटप केले. त्याचे हे कार्य बघून त्याचे मित्र मदतीला आहे. सर्वांनी शक्ती नुसार आर्थिक मदत करणे सुरू केले व हा कारवा सुरू झाला. समाज माध्यमावरून मदतीकरिता आव्हान करन्यात आले. त्याला परिसरातील मातृभूमीशी नाळ जुळलेल्या देशात व परदेशात कार्यरत मित्रपरिवाराने व इतरांनी मोठ्या प्रमाणात मदत करणे सुरू केले. ” हम चलते गये।काँरवा बनता गया।” गेल्या पंचेविस दिवसापासून हा उपक्रम अखंड पणे सुरू आहे. मित्र अक्षय विरखेडे, पवन कळंबे, तुषार राऊत ,मयूर सावरकर, नयन सोळंकी,प्रफुल कोढे, नितीन बोकडे,रोशन बेहनिया यांची मयूर ला मोठी मदत या कार्यात होत आहे. जलालखेडा , लोहरी सावंगा,भिष्णोर परिसरातील तब्बल ४६ गावातील ४६५ गरजू कुटुंबाना मयूर व मित्र परिवाराने आजवर मदत केली.
१२५ च्या जवळपास परिसरातील गरजू रुग्णांना औषध पुरवठाही केला.
प्रस्थापिता कडून सामन्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढणे, प्रशासनातील चुका वर बोट ठेवणे या स्थायी स्वभावामुळे मयूर याची जहाल प्रतिमा निर्माण झाली होती. त्याच्या या कोणताही गाजावाजा न करता सुरू असलेल्या मदत कार्यामुळे त्याच्यातील माणुसकीचे दर्शन सर्वाना होत आहे.
त्याने सर्वे मदत करणाऱ्या मित्रपरिवाराचे आभार मानले

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …