*युवा व्यापाऱ्याने लावला गळफास*
*त्याच्या आत्महत्तेचे कारण काय…?*
*प्रतिनिधी दिनेश चौरसीया सावनेर*
*”लॉकडाउन’ कधी संपेल व कधी पुन्हा व्यवसाय सुरू होईल, यावरून व्यापारी वर्ग चिंतेत आहे. लॉकडाउनला जवळपास दिड महिना लोटल्यानंतर देशात निर्माण झालेल्या अनेक व्यावसायिक व पारिवारिक खर्च कोठून अश्या समस्यांमुळे सावनेर गडकरी चौकातील कपडा व्यापाऱ्याने रात्री 2 च्या सुमारास पत्नीला गरमी मुळे बाहेरील खोलीत झोपतो, असे सांगून रूमच्या वरील रॉडला गळफास घेऊन आत्महत्या केली.*
*सावनेर :कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने देशात लॉकडाउन घोषित केले. दिड महीना लोटूनही लॉकडाउन न उघडल्याने नेहमीच्या बंदला त्रासून व व्यवसायात होत असलेल्या नुकसानीमुळे येथील कापड व्यापाऱ्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. राजू चांडक (44) आत्महत्या करणाऱ्या तरुण व्यापाऱ्याचे नाव आहे.*
*जगात कोविड-19 या विषाणूने मागील पाच-सहा महिन्यांपासून थैमान धातले आहे. भारतातही या जीवघेण्या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने व यावर औषधोपचार नसल्यामुळे यावर काही उपाययोजना शोधण्याकरिता भारत सरकारला देशात लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागला. परंतु दिवसेंदिवस संक्रमण कमी होण्याऐवजी वाढतच आहे. दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने दीड महिन्यांपासून बंद आहेत. “लॉकडाउन’ कधी संपेल व कधी पुन्हा व्यवसाय सुरू होईल, यावरून व्यापारी वर्गात घालमेल सुरू आहे. लॉकडाउनला दिड महिना लोटल्यानंतर देशात निर्माण झालेल्या अनेक समस्यांमुळे मानसिक खच्चीकरण होऊन सावनेर गडकरी चौकातील कपडा व्यापाऱ्याने रात्री 2 च्या सुमारास पत्नीला गरमीमुळे बाहेरील खोलीत झोपतो, असे सांगून रूमच्या वरील रॉडला गळफास घेऊन आत्महत्या केली.*
*मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिले होते कारण*
*सकाळी राजूने खोलीचे दार न उघडल्याने घरच्यांनी शटर खालून बघितले असता राजूचे पाय लटकताना दिसले. त्यामुळे सावनेर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. दार तोडून त्याला सावनेर रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी राजूला मृत घोषित करीत त्याचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला.*
*राजूच्या पश्चात एक पत्नी व 12 वर्षाची एक मुलगी आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात त्याने लॉकडाउनला त्रासून आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे, असे सांगण्यात येत आहे.*