*किराणा दुकानावर धाड*
*एफडीए आणि अन्न पुरवठा विभागाची संतुक्त कार्यवाही*
*लॉक डाउन काळात सावनेर तालुक्यातील पहिली कार्यवाही*
*विशेष प्रतिनिधी खापरखेडा-*
*सावनेरः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला आहे काही अंशतः संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे मात्र लॉक डाऊनच्या अनेक व्यापारी चढ्या भावाने विक्री करण्यात येत आहे त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या खिश्याला चुना बसत आहे*
*यासंदर्भात जयभोले नगर खापरखेडा परिसरातील एका किराणा दुकानावर ७ में गुरुवारला दुपारच्या सुमारास नागपुर एफडीए विभाग आणि अन्नपुरवठा विभाग सावनेर यांनी संतुक्त कार्यवाही करीत धाड टाकली दहेगाव खापरखेड़ा मुख्य मार्ग जयभोले नगर परिसरात असलेल्या श्री लक्ष्मी नारायण किराणा स्टोअर्स या दुकानात सर्व सामान्य नागरिकांना चढ्या भावाने विक्री करीत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सावनेर अतुल म्हेत्रे यांना मिळाली उपविभागीय अधिकारी म्हेत्रे यांनी तहसीलदार दीपक कारंडे यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले तहसिलदार दीपक करांडे यांनी अन्न पुरवठा विभागाच्या महिला अधिकारी वसुधा रघाटाटे व एफडीए नागपूर विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी स्मिता बाभरे यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले*
*प्राप्त माहिती नुसार चनकापूर परिसरातील गोलू शाहू यांनी चार पाच दिवसांपूर्वी श्री लक्ष्मी नारायण किराणा दुकानातून अंजीर विकत घेतले होते सदर दुकानदार मालकाने बिल न देता चढ्या भावाने विक्री केली शाहू यांनी अंजीर घरी घेऊन गेले असता त्यात अळ्या दिसून आल्या यासंदर्भात दुकानदारांला माहिती दिली मात्र त्यांनी योग्य उत्तर दिले नाही त्यामुळे व्यतीत होऊन सावनेर पंचायत समिती सदस्य राहुल तिवारी यांना माहिती दिली लॉक डाऊन काळात सर्व सामान्य माणसांना लुटणाऱ्या दुकांनदारावर कार्यवाही झाली पाहिजे या दृष्टीकोनातून पंचायत समिती सदस्य राहूल तिवारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली ७ में गुरुवारला सदर किराणा दुकानावर धाड टाकून संबंधित अधिकाऱ्यांनी काही सॅम्पल जप्त केले यासंदर्भात सखोल तपास करून दुकानंदारावर कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे एफडीए नागपूर विभागाच्या अधिकारी स्मिता बाभरे यांनी सांगितले चढ्या भावाने विक्री होत असल्याने दुकानासमोर रेटबोर्ड लावण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना आहेत मात्र याकडे कोण्ही विशेष लक्ष देत नाही.*
*अचानक पडलेल्या धाडीमुळे किराणा व्यवसायात भीतीचे वातावरण*
*तालुक्यातील जवळपास किराना व्यवसाय लाँकडाऊन ची आड नागपूर वरुन माल येत नसल्याचे सांगत कु्त्रीम टंचाई चा पाढा वाचत दोन पैशे जास्त कमावन्याच्या बेतात असल्याचे सर्वत्र बोलल्या जात असून काही प्रमाणात दरवाढीच्या घटनाही उघडकीस येत आहे कुणी संबधाच्या नात्याने बोलण्याकरिता पुढे येत याचाच फायदा उचलू पाहणार्या दुकानदारांचे धाबे दनानले आहे.व अश्याच प्रकारच्या कारवाया सातत्याने होत असल्याने गोरगरीब जनतेस योग्य दरात जिवन आवश्यक वस्तू मीळने सोईचे जाईल असे जाणकारांचे मत आहे*