*विद्युत कामगार युनियन कडून 13.36 लाखांची मदत*
*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
नागपुर:- तिन्ही वीज कंपनीत प्रमुख संघटना म्हणून कार्यरत असणाऱ्या विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन तर्फ मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 13.36 लाखाची रक्कम संकलित करण्यात आली. ही रक्कम सरचिटणीस आर. टी. देवकांत यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.
निधी जमा करण्यासाठी तांत्रिक शक्तीचे संपादक राम चव्हाण, संघटक हेमंत कुंभार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ पळसे, संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष रवी बारई, उपाध्यक्ष गजानन सुपे, प्रवीण पाटील, सरचिटणीस नितीन पवार, उत्तम रोकडे, बाळासाहेब गायकवाड, राज्य सचिव हरीराम गिते, कोषाध्यक्ष संतोष घाडगे, निर्वाह भत्ताचे विश्वस्त शैलेश पेंडसे, कल्याण मंडळाचे विश्वस्त रवी वैद्य यांनी परिश्रम घेतले.