*मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा*
खात –लग्न म्हटले की, वाज्यापासून वरात आणी जेवणापर्यतच्या पंगतीचे चित्र डोळ्यापुढे उभे राहते.मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या सर्व बाबी बाजूला सारुन मोजक्याच आप्तस्थाच्या उपस्थितीत रविवारला ग्रामपंचायत प्रशासनाच्या पुढाकाराणे शुभमंगल सावधान पार पडले.प्रशासनाने स्वतः लक्ष देत सोशल डिस्तशिंग, मास्क, सेनिटायझरचा वापर करून रविवारला खात येथिल वधु पुजा ओमप्रकाश साठवने हिचा विवाह कान्द्रि येथिल वर ज्ञानेस्वर महादेव गिर्हेपुंजे यांच्यासोबत लाऊन दिला यावेळी वधुकडील व वराकडील मोजक्या लोकांच्या साक्षीने नवजोडप्याला लग्नाच्या रेशीमगाठित बांधले.
मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा साधेपणाने पार पडल्याने दोन्ही कुटुंबाची मोठी आर्थिक बचत झाली शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत हा विवाह सोहळा खात येथे वधुच्या घरी पार पडला.रविवारला १०:३० वा.त्यांचा विवाह सोहळा पार पडला यावेळी खात ग्रामपंचायत सरपंच ज्योती डहाके, उपसरपंच शंकर वैध, सदस्य राकेश बागडे, माजी सरपंच कैलाश वैध, माजी उपसरपंच ज्योतीपाल गजभिये, शैलेश गिर्हेपुंजे तसेच वधु वर पक्षाकडील ५-५ लोक या लग्न सोहळ्यात सहभागी झाले होते हा लग्न सोहळा समाजासमोर आदर्श ठरला असुन भविष्यात असाच पद्द्तीने बिवा सोहळा पार पाडावा जेणेकरून वर व वधुच्या वडिलांची पैसाची बचत होईल अशा मत ग्रा.पं.सदस्य राकेश बागडे यांनी व्यक्त केला.