*मीत्र बनला वैरी दगडाने ठेचुन पाठवले यमसदनी*
*लाँकडाऊन व दारुची दुकाने बंद असुन मीळाली कुठून तपासाचा विषय*
*स्थानीय गुन्हेशाखेने अवघ्या १२ तासात खुनाचे प्रकरण केले उघड आरोपीला अटक*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेरः सावनेर खापा रोड बायपास ओव्हर ब्रिज च्या बाजूला ऊसाच्या शेतात मध्यरात्रीच्या दरम्यान अनओळखी युवकाचा खुन करून मृतदेह फेकून दिल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली सदर घटने मुळे परिसरात एकच खळबळ उडाली.*
*प्राप्त माहिती अनुसार युवकाच्या खिश्यातील असलेल्या पुराव्या मुळे युवकाची ओळख पटली युवकाचे नाव उद्देश प्रेमदास बागडे , वय २२ , रा.वाघोडा तह सावनेर आहे.*
*सावनेर पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गाठून घटनास्थळ पंचामाना करुण युवकाचा खुन दगडाने ठेचुन अंत केला असल्याचा संशय प्रथमदर्शनी निदर्शनास आले.मृतक युवकाचे पार्थिव ताब्यात घेऊण शवविच्छेदना करीता रवाना आले.*
*सदर हत्तेचा तपास स्थानीय गुन्हेशाखे कडे गेल्यावर पी.एस.आय.गौरखेडे व यांच्या टीमने अवघ्या १२ तासात आरोपींचा कसुन तपास करीत गुप्तचर माहितीच्या आधारावर आरोपींचा सुराग लावला व आरोपी सारंग वासुदेव अनासपुरे, वय २४ रा. सावनेर वेकोली वसाहत याला अटक करून हत्तेच्या गुन्ह्याची नोद करण्यात आली*
*हत्तेचे कारण काय…?*
*आरोपी सारंग वासुदेवराव अनासपुरे व मृतक उद्देश प्रेमदास बागडे हे दोघेही चांगले मित्र असुन शनिवारी रात्री सावनेर खापा बाय पास रोडच्या कडेला बसून दारू पीत होते या दरम्यान दोघा मध्ये काही अज्ञात कारणावरून शाब्दिक चकमक सुरु होत याचे रुपांतर हातापायीत होताच आरोपी सारंग याने दारूच्या नशेत धुत उद्देशचा डोक्यावर दगड आदडून नंतर त्याच दगडाने ठेचुन खुन केला व जवळ च्या उसाच्या शेतात सोडून पळून गेला.*
*घटनेचे गांभीर्य बघून घटनेचा तपास स्थानीय गुन्हेशाखेचे पी.एस.आय.गौरखेडे यांच्या मार्गदशनात वैरागडे , बाबा केचे, गडेकर, सनोडिया,नाना राउत ,रोहन डाखोळे चालक लांजेवार आदिनी कार्यवाही केली व आरोपीला 12 तासाच्या आत जेरबंद करुण सावनेर पोलिसांच्या ताब्यात दिले.*
*पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक सरंबळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक कोळी,एपीआय सागर कारंडे व कर्मचारी पुढील तपास करत आहेत*
*बंद मधे दारू भेटली कुठून*
*कोरोना विषाणूंचा प्रादुर्भावामुळे सुरु असलेल्या लाँकडाऊन मधे मध (दारू) विक्री वर बंदी असुन यांना ही दारु उपलब्ध कोठून झाली हा ही तपासाचा भाग असावा व ज्या ठिकाणावरून ही दारु घेण्यात आली त्यालाही सदर घटनेचा सह आरोपी बनवून अश्याप्रकारे अवैध रुपात व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई होणे ही गरजेचे आहे असे जानकारांचे मत आहे*